जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दोन गटात काठ्या-कोयत्याने मारहाण,१५ जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात साईनगर परिसरात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत थेट काठ्या व कोयत्याचा वापर आलेला असून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने कोपरगाव शहारत खळबळ उडाली आहे.

फिर्यादी मनीष दिलीप गरुड (वय-२०) चालक रा.जेऊर पाटोदा व सोपान दगडू गायकवाड (वय-४२) रा.साईनगर या दोघांच्या गटात मागील काही दिवसापासून अज्ञात कारणाने भांडण सुरु होते.त्याचे पर्यावसान काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास साईनगर येथील भालेराव यांच्या घरासमोर भांडण झाले.यात दोन्ही बाजूने गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी कोयता,लाकडी दांडा,विटाचे तुकडे आदींच्या सहाय्याने एकमेकांविरुद्ध लाकडी दांडा,कोयता,लोखंडी गज आदीं हत्यारांचा सहाय्याने एकमेका विरोधात हाणामारीत होऊन येथेच्छ वापर करण्यात आला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरानजीक जेऊर पाटोदा व साईनगर हे उपनगरे जवळ-जवळच आहे.या उपनगर परिसरात फिर्यादी मनीष दिलीप गरुड (वय-२०) चालक रा.जेऊर पाटोदा व सोपान दगडू गायकवाड (वय-४२) रा.साईनगर या दोघांच्या गटात मागील काही दिवसापासून अज्ञात कारणाने भांडण सुरु होते.त्याचे पर्यावसान काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास साईनगर येथील भालेराव यांच्या घरासमोर भांडण झाले.यात दोन्ही बाजूने गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी कोयता,लाकडी दांडा,विटाचे तुकडे आदींच्या सहाय्याने एकमेकांविरुद्ध लाकडी दांडा,कोयता,लोखंडी गज आदीं हत्यारांचा सहाय्याने एकमेका विरोधात हाणामारीत होऊन येथेच्छ वापर करण्यात आला आहे.त्याची खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही गटाच्या इसमांना ताब्यात घेतले त्यात आरोपी नितीन सोपान गायकवाड,शुभम सोपान गायकवाड,सोपान दगु गायकवाड,सर्व रा.साईनगर,अनिल गणेश जाधव,गौरव गंगूले,सनी गायकवाड,रा.गांधीनगर कोपरगाव यांचे विरुद्ध तर दुसऱ्या गटाचे आरोपी सिद्धार्थ गरुड,योगेश गरुड,लखन (तुषार) पठारे,मनीष गरुड,रोहित वानखेडे,गणेश गरुड,रितेश गरुड,सिद्धू शिरसाठ,अजय पठारे,सर्व रा.जेऊर पाटोदा ता.कोपरगाव आदींनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.न.७१७/२०२० भा.द.वि.कलम ३२६,१४३,१४७,१४९,३२३,५०४,५०६ महा.पोलीस कायदा कलम १४४ प्रमाणे फिर्यादी मनीष दिलीप गरुड, व सोपान दगडू गायकवाड यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.गायमुखे हे करीत आहे.दरम्यान या घटनेने या परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आदींनी भेट दिली आहे.परिस्थिती तणावपूर्ण मात्र शांततेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close