नगर जिल्हा
वाकडी मार्गे प्रवास झाला जीवघेणा !
जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी (प्रतिनिधी)
वाकडी मार्गे जाणारा हा रस्ता जिल्हापरिषद कडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाल्यास जास्त निधी नुसार रस्त्याचे मजबूत व पक्के काम होऊन रस्ता रुंदीकरण देखील होईल.मात्र आता सध्या या रस्त्याची असलेली दुरावस्था पाहता तात्काळ दुरुस्तीची गरज आहे. या अत्यंत खराब व जीवघेण्या रस्त्यामुळे बहुतेक वाहन धारक चितळी मार्गे किंवा नांदूर मार्गे आपली वाहन ने-आण करत आहे.
नुकत्याच सुरु असलेल्या सततच्या पावसाने या रस्त्यावरील मोठया खड्ड्यात पाणी साचत असल्याने या अपघाती खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.गेली १२ वर्षापूर्वी श्रीरामपूर महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरणा कडून दत्तनगर फाटा ते यशवंतबाबा चौकी असा सुमारे सात कि.मी. रस्ता मजबूत करण्यात आला होता मात्र पुढील गणेशनगर ते वाकडी धनगरवाडी फाटा पर्यंत रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असल्याने निधीला मर्यादा असल्याने कमी रकमेत हा रस्ता तात्पुरता दुरुस्त केला गेला होता.त्यानंतर देखील या रस्त्यावर आजवर मलमपट्टी शिवाय मोठी दुरुस्ती होऊ शकली नाही.या रस्त्यावरून जाणारा वाकडी धनगरवाडी भाग जिल्हापरिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत हा परिसर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात आहे.या भागास कोपरगाव विधानसभा मतदार संघ असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. आशुतोष काळे आहेत. तर हा भाग शिर्डी लोकसभा मतदार संघात असून शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे आहेत.एकंदरीत वाकडी भागातील या अत्यंत खराब जीवघेण्या रस्त्याच्या देखरेखीत तीन पक्षांचे तीन कर्तृत्ववान नेते आहे.या जीवघेण्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रहार संघटना,छावा संघटना,आम आदमी पार्टी,आर.पी.आय.,भीमशक्ती संघटना व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मुंडन,वृक्षरोपण,भीकमागो आंदोलन केले मात्र अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीची पुढील प्रगती झाली नाही व कोणतीही निविदा प्रक्रिया राबवली नाही.जिल्हा परिषद अहमदनगर कडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग होणे कामी प्रस्ताव दिला असून हा प्रस्ताव नाशिकहून मंत्रालय मधे प्रलंबित आहे.वाकडी मार्गे जाणारा हा रस्ता जिल्हापरिषद कडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाल्यास जास्त निधी नुसार रस्त्याचे मजबूत व पक्के काम होऊन रस्ता रुंदीकरण देखील होईल.मात्र आता सध्या या रस्त्याची असलेली दुरावस्था पाहता तात्काळ दुरुस्तीची गरज आहे. या अत्यंत खराब व जीवघेण्या रस्त्यामुळे बहुतेक वाहन धारक चितळी मार्गे किंवा नांदूर मार्गे आपली वाहन ने-आण करत आहे. परिणामी वाकडी गणेशनगर भागातील व्यावसायीक बाजारपेठ कमकुवत होत चालली आहे. तसेच या रस्त्यावरून ये जा करताना खड्डे हुकविताना अपघात व इतर वाहनांना कट लागणे सारखे प्रकार झाल्याने परिणामी वाहन चालकांमधे वाद-विवाद निर्माण होत आहे.तर या खड्ड्यांना हूलकावणी देताना किरकोळ अपघात देखील झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची भीषणता लक्षात घेता हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी वाकडी,धनगरवाडी,गणेशनगर दत्तनगर ग्रामस्थ व प्रवाशी वर्गातुन होत आहे.