जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील बेशिस्त तेरा नागरिकांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोना विषाणूची साथ अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या साठी कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून काल सकाळ पासून केलेल्या कारवाईत तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार १२४ इतकी झाली आहे.त्यात १३९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत २० जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या २४ झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील १४ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील १० जण असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार १२४ इतकी झाली आहे.त्यात १३९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत २० जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई काल दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान केलेल्या कारवाईत शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत त्यात आरोपी अजगर याकूब खाटीक (वय-४२) रा.दत्तनगर कोपरगाव,मतींन शेखलाल शेख (वय-२०),रा.जुनी मामलेदार कचेरी,इस्माईल गुलाब पठाण (वय-५५) रा.खडकी,समीर उमर बागवान (वय-४५) रा. येवला रोड,संजय बापूराव सोमासे (वय-५२), रा.येवला रोड,अबूबकर अनिस अत्तार (वय-२६ ) रा.आयेशा कॉलनी,उमर अनिस अत्तार (वय-३०) रा.आयेशा कॉलनी,सर्व रा.कोपरगाव,कुणाल सीताराम क्षीरसागर (वय-३२) रा.फत्ते बुरुज नाका,येवला,जिल्हा नाशिक,नंदकिशोर लक्ष्मण निंबाळकर (वय-४८) रा, कोळपेवाडी,राधेश्याम विजयसिंग परदेशी (वय-३७) रा.बुंदेलपुरा येवला जिल्हा नाशिक,अतुल विठ्ठल वारे (वय-२५) रा.पाटोदा ता.येवला,नकुल शरद रुपनर (वय-३२) रा.रेल्वे स्टेशन कोपरगाव,आकाश ज्ञानेश्वर गाढे (वय-२५) रा, खंडोबा चौक राहाता,आदीं तेरा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गादीवर फोनवर बोलणे,शासनाने दिलेले आदेश न पाळणे आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९०,कलम २८३ प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम-१५८,१३०,/१७७,५०,५१/१७७ प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ससाणे,पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे,आर.पी.पुंड,डी.आर.तिकोणे,श्री खारतोडे,श्री दारकुंडे आदी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close