जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मुखपट्या नाही,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोना विषाणूची साथ अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या साठी पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून आज सकाळ पासून केलेल्या कारवाईत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातून नऊ बेशिस्त नागरिकांवर मुखपट्टी न बांधल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ३३४ इतकी झाली आहे.त्यात १९२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आता कडक धोरण अवलंबले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण ३४ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात ४ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात पढेगाव येथील ६० वर्षीय पुरुष तर अंचलगाव येथील येथील ४६ वर्षीय पुरुष तर कोपरगाव शहरातील इंदिरापथ येथील २९ वर्षीय पुरुष,तर जाणकीविश्व येथील ६४ वर्षीय पुरुष बाधित निघाले असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ३३४ इतकी झाली आहे.त्यात १९२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई आज धारणगाव रस्त्यावर माधव बागेसमोर करण्यात आली आहे.त्यात आरोपी दशरथ नारायण शिंगाडे (वय-५०) रा.कोळपेवाडी,नितीन बालचंद्र मनाळ (वय-२९),रा.वाहेगाव ता.गंगापूर,निलेश अशोक वाबळे (वय-४५) रा.सुतार गल्ली राहाता,राजू रशीद शेख (वय-२२) रा.सावळीविहिर,दीपक शरद सरोदे (वय-२५) रा.कोळगाव पाटी ता.कोपरगाव,कल्याण सुभाष वैद्य (वय-३०) रा.शारदा नगर,राजेश सुभाष गंगवाल (वय-४३) रा.चर्च समोर कोपरगाव,सचिन सुभाष मुंदडा,(वय-४५) रा.नवीन जैन मंदिर कोपरगाव,चंद्रकांत नाना आव्हाड (वय-३८) रा.मनमाड,आदी विरुद्ध फिर्यादी पो.कॉ.जयदीप दामोदर गवारे,अंबादास रामदाथ वाघ,मनोज अण्णा काटे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९० प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम-१८५ प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close