कोपरगाव तालुका
चोरीसाठीं लपून बसलेला आरोपी जेरबंद,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील फादरवाडीच्या मागे चोरीच्या उद्देशाने लपून बसलेला आरोपी ऋषिकेश सोमनाथ सावंत (वय-२३) रा.टिळकनगर यास मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहर पोलिसानी अटक केली असून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी रात्री बारा वाजेच्या सुमारास नागरिकांच्या हितासाठी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गस्त सुरु असताना त्यांना फादर वाडी चर्चच्या मागे एक व्यक्ती संशयीतपणे लपून बसलेली आढळली. त्यांनी आपला मोर्चा त्या ठिकाणी वळवला असता त्या ठिकाणी रात्री १२.२५ वाजता आरोपी ऋषिकेश सावंत हा मिळून आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर पोलिसानी रात्री बारा वाजेच्या सुमारास नागरिकांच्या हितासाठी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गस्त सुरु असताना त्यांना फादर वाडी चर्चच्या मागे एक व्यक्ती संशयीतपणे लपून बसलेली आढळली. त्यांनी आपला मोर्चा त्या ठिकाणी वळवला असता त्या ठिकाणी रात्री १२.२५ वाजता आरोपी ऋषिकेश सावंत हा मिळून आला आहे.पोलिसानी त्याला तत्काळ अटक करून आपल्या ताब्यात घेतले आहे.
त्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.५३४/२०२० मुंबई पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे आरोपी सावंत विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.