कोपरगाव तालुका
स्वातंत्र्यदिनी..या गावातही कोरोना योद्ध्यांचा सन्मान !
जनशक्ती न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतीनिधी)
जगभर कोरोनाच्या साथीने कहर उद्भवलेला असताना या साथीत आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आरोग्य दूत अर्थात कोरोना योद्धयांचा कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या योगिराज तुकाराम बाबा विद्यालय व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोरोना योद्धयांचा उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यापासून कोरोना संसर्गाची या पार्श्वभूमीवर गावची कोरणा संसर्ग दक्षता कमिटी चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे गावाला नागरिकांनच आरोग्य चांगले राखता आले.गावामध्ये कोरोना संसर्ग जनजागृती प्रशासनाच्या आदेशानुसार वेळी टाळेबंदीत व्यापारी वर्गाने मोठे सहकार्य केले प्रत्येक नागरिकांनी मुखपट्यासह प्रतिबंधात्मक साहित्याचा वापर केला आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ४५७ इतकी झाली आहे.त्यात ११९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.०५ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार ३८७ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार ५४८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १९.०१ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३३१ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७२.४२ टक्के झाला आहे.या पार्श्वभूमीवर हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी गावचे सरपंच प्रशांत घुले,उपसरपंच दिगंबर बढे,शाळा समितीचे रामराव साळुंखे,शिवाजीराव घुले,शिवाजीराव कदम,वसंतराव घुले,आशिष थोरात, भगवान चंदनशिव,गावचे ग्रामसेवक संजय डवले,गावचे पोलीस पाटील उल्हास मेढे,कृषी सहाय्यक निलेश बिबवे,ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ,आशिष थोरात,अशोकराव वाघ,तंटामुक्तीचे अध्यक्ष शेळके, शिवाजी भारती,रेशन दुकानदार बाळासाहेब निळकंठ सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गेल्या चार ते पाच महिन्यापासून कोरोना संसर्गाची या पार्श्वभूमीवर गावची कोरणा संसर्ग दक्षता कमिटी चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे गावाला नागरिकांनच आरोग्य चांगले राखता आले.गावामध्ये कोरोना संसर्ग जनजागृती प्रशासनाच्या आदेशानुसार वेळी टाळेबंदीत व्यापारी वर्गाने मोठे सहकार्य केले प्रत्येक नागरिकांनी मुखपट्यासह प्रतिबंधात्मक साहित्याचा वापर केला आहे.जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलांचा आहार तसेच रेशन दुकान च्या माध्यमातून रेशन वाटप शेतकऱ्यांना साठी असलेल्या शेतीशाळा,पिक विमा योजना,पी.एम.किसान योजना आदींची जनजागृती आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आली.आरोग्य अधिकारी व अंगणवाडी सेविका यांचे सतत चाललेले नागरिकांची काळजी घेण्यासाठी हे सर्वेक्षण आदी उपक्रम दक्षता कमिटीचे सरपंच प्रशांत घुले व दिगंबर बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले आहे.
याबद्दल रयत शिक्षण संस्था महाविद्यालय व ग्रामस्थांच्यावतीने या विविध उपक्रम उपक्रमाबद्दल गावचे पोलीस पाटील उल्हास मेढे,सरपंच प्रशांत घुले,उपसरपंच दिगंबर बढे, ग्रामसेवक संजय डवले,कृषी सहाय्यक निलेश बिबवे,विद्यालयाच नवीन हजर झालेले गावचे भूमिपुत्र प्राचार्य ठाणगे सर आदींचा सत्कार स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री शिंदे सर यांनी केले व श्री प्राचार्य यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.