जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणीवर शारीरिक अत्याचार,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेला आरोपी अभिषेक वसंत कनगरे याने येवला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या युवतीवर (वय-१९) एक वर्ष शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी सदर तरुणीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.

सदर फिर्यादी तरुणी हि मूळ श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून ती येवला तालुक्यात शिक्षण घेत आहे.तिची आरोपी याची एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती.त्यातून त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले होते.मात्र त्यात नंतर वितुष्ट आले असल्याचे मानले जात आहे.

  सदर फिर्यादी तरुणी हि मूळ श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून ती येवला तालुक्यात शिक्षण घेत आहे.तिची आरोपी याची एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती.त्यातून त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले होते.मात्र त्यात नंतर वितुष्ट आले होते.तरीही त्याने सदर तरुणींवर शारीरिक अत्याचार केले असल्याचा सदर फिर्यादीचा आरोप  असून त्यातून हा गुन्हा सदर तरुणीने दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी भेट दिली आहे.त्यांनतर हा गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२२९/२०२४ भा.द.वि.३७६ प्रमाणे ऑरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close