जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात तब्बल ५१ कोरोना रुग्ण वाढले !

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग तीन दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत सर्वाधिक उच्चांक आज गाठला असून आज १२२ अँटीजन रॅपिड टेस्ट पैकी ५१ जण तर नगर येथील तपासणीत असे ५१ रुग्ण बाधित निघाले त्यात शहरात ३७ रुग्ण तर आठ खेड्यात १४ रुग्ण बाधित आढळले आहे.तर बाधित १९ जणांना आज उपचारानंतर मुक्त करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.तर नागपूर स्थित एकाचे निधन झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ५०९ इतकी झाली आहे.त्यात १५१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार ५०९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १० हजार ०३६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १९.०१ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३५० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६८.७६ टक्के झाला आहे.

दरम्यान बाधित आढळलेल्या रुग्णांत कोपरगाव येथील लक्ष्मीनगर येथील दोघे बाधित निघाले असून त्यात एक ५७ वर्षीय स्त्री व ४५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.यशवंत चौक येथील पाच स्रिया बाधित निघाल्या असून त्यांचे (अनुक्रमे वय-२८,१५,४०,२२,१४) व दोन युवक वय -२० व २५ यांचा समावेश आहे.दत्तनगर येथील दोन स्रिया बाधित निघाल्या असून (वय- ४५ व २३) याशिवाय दोन ३० व ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.टिळकनगर येथील ६० वर्षीय स्त्री व ७० व १९ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.बँक रोड येथे ३६ व २६ वर्षीय स्रिया,जुने पोस्ट ऑफिस येथे ५४ वर्षीय पुरुष,खडकी येथे ४४ वर्षीय स्त्री, सुभाषनगर येथे ३५ वर्षीय स्त्री व ४२ वर्षीय पुरुष,धारणगाव रोड ७८ वर्षीय स्त्री व २१ वर्षीय युवक,सुभद्रा नगर येथे २२ व४३ वर्षीय स्रिया,विवेकानंदनगर येथे ६५ वर्षीय स्रि व ३५ वर्षीय पुरुष,तेरा बंगले येथे ३८ वर्षीय स्त्री,सेवानिकेतन नजीक ५४ व २९ वर्षीय स्रिया,गांधीनगर येथे ३३,१४,व १५ वर्षीय स्रिया,शिवाजीरोड येथे ३२ वर्षीय पुरुष व राम मंदीर येथे ८ व २ वर्षीय बालिकांसह एकूण ३७ जणांचा समावेश आहे.

तर कोपरगावच्या ग्रामीण भागात सुरेगाव येथील २६ वर्षीय स्त्री,खोपडी येथील ४० वर्षीय पुरुष, ब्राम्हणगाव येथील एक सत्तावीस २७ वर्षीय स्त्री व ३० व ५५ वर्षीय पुरुष असे तीघे बाधित निघाले आहे.तर कासली येथे प्रथमच एक ७० वर्षीय पुरुष,तर देर्डे चांदवड येथील ५४ व ४५ वर्षीय पुरुष असे दोघे जण बाधित निघाले आहे.टाकळी ग्रामपंचायत हद्दीत एक ४६ वर्षीय स्त्री तर एक ५२ वर्षिय पुरुष से दोघे बाधित निघाले आहे.अंचलगाव येथे तिघे बाधित निघाले असून त्यात एक ५३ वर्षीय स्त्री तर ५८ वर्षीय पुरुष व २८ वर्षीय तरुण या तिघांचा समावेश आहे.या शिवाय जेऊर कुंभारी येथील एक ७५ वर्षीय स्त्री पीडित निघाली आहे.

दरम्यान बडोदा बॅन्केतील एका अधिकाऱ्यांच्या निधनाने तालुका प्रशासनाने आज तातडीने बडोदा बँक बंद करण्याचा निर्णय घेतला असून बँकेत असणारे सहा अधिकारी व सात कर्मचाऱ्यांना तातडीने ताब्यात घेऊन कोविड सेंटर येथे तपासणीसाठी त्यांची रवानगी केली आहे.त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close