जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कार घेण्यासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी महिला सुवर्णा प्रतीक तळेकर (वय-२६) हिचा माहेर वरून कार व फर्निचर घेण्यासाठी आपल्या माहेरवरून आई वडिलांकडून १० दहा लाख रुपयांची रक्कम आणावी यासाठी तिचा नगर औद्योगीक वसाहत येथे रहिवासी असलेला नवरा प्रतीक रामदास तळेकर,सासरा रामदास बबन तळेकर,सासू मनीषा रामदास तळेकर,व नणंद कमलाबाई ज्ञानदेव पवार,संगीता महादेव दानवे आदींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

 

भारतात हुंडा देणे किंवा घेणे दोन्ही बेकायदेशीर आहे.हुंडाचा अर्थ आहे जी संपत्ती,लग्नाच्या वेळी वधूच्या कुटुंबातर्फे वराला दिली जाते. हुंडाला उर्दूमध्ये जहेज म्हणतात.युरोप,भारत,आफ्रिका आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पद्धतीचा मोठा इतिहास आहे.भारतात याला दहेज,हुंडा किंवा वर-दक्षिणाच्या नावाने ओळखले जाते. त्यातून अनेक अनर्थ घडत आहेत अशीच घटना नूकतीच उघड झाली आहे.

भारतात हुंडा देणे किंवा घेणे दोन्ही बेकायदेशीर आहे.हुंडाचा अर्थ आहे जी संपत्ती,लग्नाच्या वेळी वधूच्या कुटुंबातर्फे वराला दिली जाते. हुंडाला उर्दूमध्ये जहेज म्हणतात.युरोप,भारत,आफ्रिका आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पद्धतीचा मोठा इतिहास आहे.भारतात याला दहेज,हुंडा किंवा वर-दक्षिणाच्या नावाने ओळखले जाते.तसेच वधूच्या कुटुंबातर्फे नकद किंवा वस्तूच्या रूपात हे वराच्या कुटुंबातला वधूबरोबर दिले जाते.आजच्या आधुनिक काळात हुंडा नावाचा राक्षस सर्व दूर पसरला आहे.मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा प्रथा आत्तापर्यंत विकराल रूपात वावरत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यातील कोकमठाण येथील माहेर असलेली फिर्यादी महिला सुवर्णा तळेकर हिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपले लग्न आई वडिलांनी दि.२६ मे २०२१ रोजी मोठ्या दिमाखात नगर येथील औद्योगिक वसाहत येथील रहिवासी असलेला वर प्रतीक रामदास तळेकर यांचेशी लावून दिले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर त्यांनी आपले खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली होती.व आपल्या माहेराहून त्यांना कार व घरात फर्निचर घेण्यासाठी १० लाख रुपये आणावे यासाठी नवरा प्रतीक रामदास तळेकर,सासरा रामदास बबन तळेकर,सासू मनीषा रामदास तळेकर सर्व रा.गजानन कॉलनी औद्योगिक वसाहत व नणंद कमलाबाई ज्ञानदेव पवार,औरंगाबाद येथील संगीता महादेव दानवे आदींनी दि.२० सप्टेंबर २०२१ पर्यंत तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण शिवीगाळ,दमदाटी करून अतोनात छळ केला आहे.त्यामुळे आपण या प्रकरणी सोक्षमोक्ष लागण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२२८/२०२४ भा.द.वि.४९८(अ) ४०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close