जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना वाढ थांबेना,कोपरगावात तातडीची बैठक संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

तहसील कार्यालय कोपरगाव येथे आज आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आढावा बैठक नुकतीच पार पडली असून तालुक्यात कोरोना रुग्ण वाढीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना तालुका प्रशासनास केल्या आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची मोठी वाढ होत असताना जिल्हा आणि कोपरगाव शहरव तालुक्यात विलक्ष्णरित्या रुग्णवाढ होत असल्याने पुन्हा एकदा टाळेबंदीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत असल्याची पार्श्वभूमीवर हि तातडीची बैठक आयोजित करण्यात अली होती.त्यावेळी त्यांनी आदेश दिले आहेत.

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे.आतापर्यंत एकूण २१ लाख ०६ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर राज्यात एकूण ०१लाख ०६ हजार ७० सक्रिय रुग्ण आहेत.नगर जिल्ह्यात बाधित रुग्ण ७८ हजार ५०३ आहे.तर सक्रिय ०२ हजार ०५८ आहे तर ७५ हजार ०८२ कोरोना मुक्त झाले आहे.तर आज पर्यंत ०१ हजार १६२ जणांचा मृत्यू झाला आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही कोपरंगाव तालुक्यात नगरहुन तपासून आलेल्या अहवालात २५ तर रॅपिड टेस्ट मधून ०१ असे एकूण २६ रुग्ण बाधित आढळल्याने कोरोनाचा कालचा विक्रम मोडीत निघाला नसला तरी हि वाढ काही थोडी थीडकी नसल्याचे समजले जात असून १० रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा टाळेबंदीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत असल्याची पार्श्वभूमीवर हि तातडीची बैठक आयोजित करण्यात अली होती.त्यावेळी त्यांनी आदेश दिले आहेत.

सदर प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,श्रावण आसने,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,आरोग्य अधिकारी समन्वयक डॉ.वैशाली बडदे,कोपरगाव ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दौलतराव जाधव,शहराचे पोलीस अधीक्षक वासुदेव देसले,आय.एम.ए.अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी,निमा अध्यक्ष डॉ.तुषार गलांडे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,डॉ.अमोल अजमेरे,डॉ.अजय गर्जे, डॉ.आतिष काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक संदीप पगारे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,मेहमूद सय्यद,फकिर कुरेशी,दिनकर खरे,राहुल जगधने,सुधाकर होन आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close