जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्याला पुन्हा कोरोनाचा डंख !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात सुरेगावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे अहवाल येणे बाकी असतानाच काल रात्री उशिरा करंजी ग्रामपंचायत हद्दीत एक ३४ वर्षीय महिला कोरोना बाधित आढल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.तालुका प्रशासनाने तातडीने गावात धाव घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या आहेत.

रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास करंजी येथील वैजापूर रस्त्यालगत नऊ चारी परिसरातील परजणे वस्ती शाळेच्या परिसरात असलेल्या या महिलेचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा डंख कोपरगाव तालुक्याला झाल्याचे उघड झाले असून आता तालुक्यात सक्रिय असलेले दोन कोरोना रुग्ण झाले आहे.हि महिला कोपरगाव आधी वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती त्यानंतर शस्रक्रिया करणासाठी कोपरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात भरती झाली होती मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी या महिलेची शस्रक्रिया करण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याचा आग्रह धरल्याने तिचा श्राव तपासणीसाठी खाजगी प्रयोग शाळेत पाठवला होता.

कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र दि.११ जुलै पर्यंत आरोग्य विभागाने १६५ जणांना ताब्यात घेतले त्यांची तपासणी करून त्यातील १५२ जणांना सोडून देण्यात आले होते तर २२९ जणांचे अहवाल तपासणी करण्यात आली होती. त्यातील १३ जण कोरोना बाधित आढळले होते.तर १२ जण रोगमुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून अकरा जुलै अखेर असलेले प्रलंबित १३ अहवाल प्राप्त होऊन ते निरंक आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली असताना त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच सुरेगावात येथील मूळ रहिवासी असलेल्या मात्र औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीत नोकरीस असलेल्या एका इसमास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी हाती आली होती.दरम्यान या कुटूंबात चार भाऊ त्यांच्या पत्नी,आई,वडिल असा मोठा परिवार आता संशयितांच्या यादीत असल्याचा अंदाज खरा ठरला असून या कुटुंबासह या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना आरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यानां तातडीने कोपरगाव शहरातील विलगीकरण कक्षात रवानगी केली होती.त्याचे अहवाल अद्याप प्रलंबित असतानाच रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास करंजी येथील वैजापूर रस्त्यालगत नऊ चारी परिसरातील परजणे वस्ती शाळेच्या परिसरात असलेल्या या महिलेचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा डंख कोपरगाव तालुक्याला झाल्याचे उघड झाले असून आता तालुक्यात सक्रिय असलेले दोन कोरोना रुग्ण झाले आहे.

हि महिला कोपरगाव आधी वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात रविवारी उपचार घेत होती त्यानंतर शस्रक्रिया करणासाठी कोपरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात भरती झाली होती मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी या महिलेची शस्रक्रिया करण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याचा आग्रह धरल्याने तिचा श्राव तपासणीसाठी खाजगी प्रयोग शाळेत पाठवला होता.तो अहवाल रात्री उशिरा मिळाल्याने हि बाब उघड झाली आहे.प्रशासनाने त्यांच्या घरातील दोन भाऊ.त्यांच्या पत्नी,मुले आदीं सहा जणांना कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.देवळांण ता.येवला या ठिकाणी त्यांची शेती असल्याने तेथे जाणें-येणे असल्याने ही महिला बाधित झाली असावी असे समजले जात आहे.

कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींनी करंजीकडे धाव घेऊन उशिरापर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजना कारणासाठी धाव घेतली आहे.अधिकची माहिती गोळा करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close