जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवैधरित्या पिस्तूल बाळगले,कोपरगावात आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस चार की.मी.अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्यमार्गावर साईधाम कमानीजवळ पाटोदा ता.येवला येथील आरोपी नामदेव रामदास बोरणारे (वय-४३) हा आपल्या मारुती एस.एक्स.४ (क्रं.एम.एच.४३ ए. जे.२७०९) या गाडीत बसून आपल्याजवळ अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानुसार कोपरगाव शहर पोलिसानी टाकलेल्या धाडीत या आरोपी जवळील विक्रीसाठी असलेले एक पिस्तूल,एक मॅगझीन,जिवंत काडतुस,एक एम.आय.कंपनीचा भ्रमणध्वनी असा ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा ऐवजासह आरोपी जेरबंद केला आहे.त्यामुळे कोपरगाव,येवला परिसरात खळबळ उडाली आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा येथील एक आरोपी साईधाम कमानीजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या कार मध्ये थांबून त्याकडे अवैध पिस्तूल असल्याची गुप्त खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षण राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसानी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून आरोपीला अटक केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरंगाव शहर परिसरात नगर-मनमाड राज्य मार्गावर एक येवला तालुक्यातील पाटोदा येथील एक आरोपी साईधाम कमानीजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या कार मध्ये थांबून त्याकडे अवैध पिस्तूल असल्याची गुप्त खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षण राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसानी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या व त्याची झाडाझडती घेतली असता त्याकडे एक पिस्तूल,एक मॅगझीन,जिवंत काडतुस,एक एम.आय.कंपनीचा भ्रमणध्वनी असा ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा ऐवज मिळून आला आहे.हे पिस्तूल विक्री करण्यासाठी हा आरोपी या ठिकाणी थांबला होता.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपी विरुद्ध गु.र.नं.२४५/२०२०,आर्म ऍक्ट ३/२५,७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करित आहेत.त्यामुळे या भागात अवैध शस्र विकणारी टोळी कार्यरत आहे काय असा सवाल निर्माण झाला आहे.या पूर्वी कोपरगाव बस स्थानकावर अनेक गावठी पिस्तूल असणारी एक बॅग मिळाली होती.मात्र त्या आरोपींचा शोध लागला नव्हता.बहुधा आरोपीने पोलिसांना पाहून त्यांनी धूम ठोकली असल्याची शक्यता आहे.यात आरोपीने कशासाठी शस्र बाळगले हे माहिती होणे आवश्यक आहे.कारण सहा महिन्यांपूर्वी भोजडे चौकी येथे एका गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून एका इसमाचा खून केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close