जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरातील गुटखा बंद करा-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव शहरात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत असताना गुटखा व तत्सम पदार्थांची मोठ्या प्रमाणावर चोरून विक्री होत असून त्याचा थुंकणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना साथ रोखण्यासाठी अडथळा होत असल्याने तालुका प्रशासनाने त्वरित बंदी घालावी अशी मागणी कोपरगाव नगरपालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच केली आहे.

गुटखा सुपारी व तंबाखू यांच्या मिश्रणामध्ये सुवासिक द्रव्ये घालून बनवला जातो. हा आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. तरीही काही लोक याचे आवडीने सेवन करतात कारण यातल्या तंबाखूमुळे याचे व्यसन लागते.मात्र तरी तरुण या व्यसनापासून दूर होत नाही हि शोकांतिका आहे.महाराष्ट्रात या गुटख्यावर बंदी आहे.

नगराध्यक्ष वाहाडणे यांनी पुढे म्हटले आहे की,अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना नियंत्रणात आहे. तहसील विभाग, नगरपरिषद, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्या समन्वयामुळेच हे शक्य झालेले आहे. बहुतांश नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे.पण कोपरगाव शहरातील काही मोजकेच दुकानदार मोठ्या प्रमाणात तंबाखू व सर्व प्रकारचे गुटके- मावा यांची विक्री करत आहेत. शासनाने विक्री करण्यास बंदी घातलेली असतांनाही अशा प्रकारे चोरून लपून विक्री करणे शहरवासीयांच्या आरोग्यासाठी घातक ठरणार आहे.कोपरगाव नगरपरिषद “मास्क लावा -थुंकू नका” असे आवाहन नागरिकांना करत आहे.अनेकांकडून दंडही वसूल करणे सुरू आहे. तरीही तंबाखू, गुटके, मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे, पिचकाऱ्या मारणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या थुंकण्यामुळेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका आहे.तंबाखू,गुटके,मावा विकणाऱ्यांमुळे शहरात व त्यांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.जर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला तंबाखू–गुटके-मावा विक्री करणारेच जबाबदार राहणार आहेत याची संबंधित विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. या कारणावरून शहरात असंतोष वाढला तर तुमची कुणीही गय करणार नाही असा इशारा दिला आहे. पैसे कमविण्यासाठी कुणी शहरातील जनतेचे आरोग्यच धोक्यात आणणार असतील तर नाईलाजाने त्यांचा बेत जनताच पाहिल असे अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी बजावले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close