जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतकऱ्यांनी सात नंबर फॉर्म भरून द्यावा-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी शेतीच्या कामा साठी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये व सर्वांना मुबलक पाणी मिळावे यासाठी वर पासून खाल पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे सात नंबरचा अर्ज भरून देण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

झावरे यांच्या मागणीला प्रतिसाद देत उपअभियंता यांनी सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरून द्यावे व तसेच आगामी काळात कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन झावरे याना दिले.तसेच अकरा क्रमांक चारीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश देखील दिघे यांनी दिले आहे.


दरम्यान या प्रश्नाबाबत त्यांनी कोपरगाव येथील पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भरत दिघे यांच्या कडे जाऊन सर्व शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे अशी मागणी करून सकारात्मक चर्चा केली.त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत उपअभियंता यांनी सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरून द्यावे व तसेच आगामी काळात कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन झावरे याना दिले.तसेच अकरा क्रमांक चारीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश देखील दिघे यांनी दिले आहे. यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले की, डावा तट कालव्यातून येवला तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवैध जलवाहिन्या टाकून पाणी चोरी करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील झावरे यांनी यावेळी केली आहे.

यावेळी विधानसभा संघटक अस्लम शेख,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,उपशहर प्रमुख कलवींदर डडीयाल, एस. टी. महामंडळाचे शहर प्रमुख भरत मोरे, सरपंच अजित सिनगर,विक्रम सिनगर,आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close