जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात होंडा शोरूमला आग लाखोंचे नुकसान

जाहिरात-9423439946

IMG_2166

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रातिनिधी)

कोपरगाव शहरातील गोदावरी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या नामवंत समजल्या जाणाऱ्या”श्रद्धा होंडा” या सरोदे मामा यांच्या मालकीच्या शो-रूमला अचानक आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत अनेक होंडा गाड्या,सौर प्रकल्पासह दुचाकी वाहनाचे सुटे भाग आदिसंह लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेचे दोन अग्निशामक बंब यांनी एक तासात आग नियंत्रणात आणली आहे.सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

दरम्यान हि आग नेमकी कशामुळे लागली या बाबत आमच्या प्रतिनिधीने या शोरूमचे मालक सरोदे मामा यांना विचारणा केली असता त्यांनी आगीचे नेमके कारण सांगता येणार नाही मात्र विद्युत शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा कयास व्यक्त केला आहे.या आगीत नेमके किती नुकसान झाले असावे या बाबतही त्यांनी आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगितले आहे.

कोपरगाव शहरात येवला रस्त्यावर गोदावरी पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या होंडा कंपनीचे शो-रुम आहे.काल शनिवारचा दिवस असल्याने त्या दिवशी कोपरगावात नगरपरिषद व तालुका प्रशासनाने घोषित टाळेबंदी असल्याने सर्वत्र दुकाने व व्यापाऱ्यांची संस्थाने बंद होती.व आज रविवारचा दिवस असल्याने मालक सरोदे यांनी आपले शोरूम शुक्रवारीच सायंकाळी बंद करून ठेवलेले होते.आज सकाळी श्री मामा सरोदे यांना काही नागरिकांचे भ्रमणध्वनी आले व त्यांनी आपल्या वर्कशॉपला मागील बाजूने धूर निघत असल्याने सांगून साबडतोब घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना वर्क शॉपच्या मागील बाजूने दागिने रौद्र रूप धारण केलेले आढळले. त्यांनी ताबडतोब कोपरगाव नगरपरिषदेला संपर्क करून या दुर्घटनेची खबर दिली. व ताबडतोब आग नियंत्रक पथकाला पाचारण केले आहे.त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व आग नियंत्रणात आणली त्यात त्यांना हि आग आटोक्यात आणण्यास जवळपास एक तासाचा कालावधी लागला आहे.या अग्नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांत नगरपरिषदेच्या पथकानेही सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान हि आग नेमकी कशामुळे लागली या बाबत आमच्या प्रतिनिधीने या शोरूमचे मालक सरोदे मामा यांना विचारणा केली असता त्यांनी आगीचे नेमके कारण सांगता येणार नाही मात्र विद्युत शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा कयास व्यक्त केला आहे.या आगीत नेमके किती नुकसान झाले असावे या बाबतही त्यांनी आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगितले आहे.मात्र या शोरूम मध्ये मात्र अनेक गाड्या दुरुस्तीसाठी नेहमीच जास्त संख्येने आलेल्या असतात त्यामुळे हे नुकसान काही लाखात असेल असा कयास व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close