कोपरगाव तालुका
..ते पाच अहवाल आले.मात्र अन्य संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील एका माध्यमिक विद्यालयातील एक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या एक महिला बाधीत झाल्याने त्यांच्याशी संपर्कात आलेल्या तीन संशयित नागरिकांचे व अन्य दोन जणांचे असे पाच व्यक्तींचे श्राव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणीसाठी पाठवले आहे.त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व निरंक आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे प्रशासनांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.मात्र या महिला डॉक्टरच्या संपर्कात अजून बरीच माणसे आली असल्याची माहिती आहे त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
दरम्यान या महिला डॉक्टर यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ती असून अनेकांनी त्यांचेकडे उपचार घेतल्याचे तर काहींनी त्यांच्याकडे आपल्या महिलांचे बाळंतपण केल्याचे अनेकांनी सांगितले आहे.तर काही खाजगी डॉक्टर हे सकाळी त्यांच्या बरोबर फिरण्यासाठी होते अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.शिवाय त्यांचे पतीदेवही शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात आपली रुग्णसेवा देत असल्याची आहिती आहे.त्यामुळे या डॉक्टरांच्या समपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तालुका व शहर पालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
कोपरगांव शहरातील एका माध्यमिक शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले व लोणी ता.राहाता येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय असे एकुण ११ व्यक्तींची रवानगी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात केली होती व त्यांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली होती.त्यांच्या पैकी आज पाच जणांचे अहवाल निरंक आले असताना एका खाजगी महिला डॉक्टर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्या होत्या.त्यांचा अहवाल खाजगी रित्या तपासणीसाठी पाठवला होता.तो बाधित आल्याने कोपगावात खळबळ उडाली आहे.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी पुन्हा धसका घेतला होता.व तहसीलदार,मुख्याधिकारी व पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले होते.त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते पाचही अहवाल निरंक आले आहे.त्यामुळे कोपरंगावकरानी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान या महिला डॉक्टर यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ती असून अनेकांनी त्यांचेकडे उपचार घेतल्याचे तर काहींनी त्यांच्याकडे आपल्या महिलांचे बाळंतपण केल्याचे अनेकांनी सांगितले आहे.तर काही खाजगी डॉक्टर हे सकाळी त्यांच्या बरोबर फिरण्यासाठी होते अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.शिवाय त्यांचे पतीदेवही शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात आपली रुग्णसेवा देत असल्याची आहिती आहे.त्यामुळे या डॉक्टरांच्या समपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तालुका व शहर पालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.या महिला डॉक्टरच्या संपर्कात संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक व महिलाही संपर्कात आले असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.