कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण वाढ !

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील एका माध्यमिक विद्यालयातील एका बाधित कर्मचाऱ्यामुळे कोपरगाव शहरातील एक खाजगी महिला डॉक्टर बाधित होऊन अवघे तीन दिवस उलट नाही तोच ठाणे येथून आपल्या दोन नातवांना घेऊन आलेल्या आजोबांना धक्का बसला असून त्यांच्या एक नातीला ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिला आहे.त्यामुळे आता कोपरगाव तालुक्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन वर पोहचली आहे.तर दोघींचे निधन झालेले आहे.तालुका प्रशासनाने आता धोत्रे गावाची नाकेबंदी करण्यास प्रारंभ केला आहे.
दरम्यान एका बाधित महिला डॉक्टरच्या संलग्न संशयित रुग्णांपैकी पंधरा जणांचे श्राव तपासणीसाठी पाठवले होते ते सर्व निरंक आल्याने तो तालुका प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.आता धोत्रे गावाकडे तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४९८ ने वाढून ती २ लाख ४७ हजार १२० इतकी झाली असून जगात आता भारत सहाव्या क्रमांकावर गेला आहे.तर देशात मृत्यू संख्या ६ हजार ९४७ वर पोहचली आहे.तर राज्यात आज अखेर हि बाधित संख्या ८२ हजार ९६८ वर पोहचली आहे. या विषाणूने २ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १९० वर जाऊन पोहचली आहे तर ०८ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.
कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र महिला डॉक्टर पाठोपाठ या मुलीची भर पडली आहे.नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा एकदा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने धोत्रे येथील हा भाग पूर्ण बंद केला आहे.मात्र आरोग्य विभागाने या आजोबा आणि नातवांना मराठी शाळेत विलगीकरण कक्षात ठेवल्याने अन्य ग्रामस्थांना या साथीची लागण झाली नाही.हि समाधानाची बाब आहे.
कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र महिला डॉक्टर पाठोपाठ या मुलीची भर पडली आहे.नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा एकदा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने धोत्रे येथील हा भाग पूर्ण बंद केला आहे.मात्र आरोग्य विभागाने या आजोबा आणि नातवांना मराठी शाळेत विलगीकरण कक्षात ठेवल्याने अन्य ग्रामस्थांना या साथीची लागण झाली नाही.हि समाधानाची बाब आहे.या गावात आता तालुका प्रशासनाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून धोत्रे गावात प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहे.त्यांना या गावातील कोरोना साखळी तोडण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात रुग्ण आढळल्याने आता ग्रामस्थांना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान एका महिला डॉक्टरच्या संलग्न रुग्णांपैकी पंधरा जणांचे श्राव तपासणीसाठी पाठवले होते ते सर्व निरंक आल्याने तो तालुका प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.