जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोपरगाव येथे कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे.कोरोना आजाराच्या वाढता प्रादुर्भाव लक्शात घेता धनगर सेवा संघाने अहिल्यादेवी होळकर जयंती सुरक्षित अंतर ठेवुन साध्या पद्धतीने धान्यमार्केट कोपरगाव येथे साजरी करण्यात आली.

एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी,खंडेरावांशी झाले.त्यांच्या निधनानंतर राज्याचा कारभार त्यांनी राघोबादादांशी टक्कर देऊन सलग सत्तावीस वर्ष यशस्वीपणे चालवला होता.

यावेळी निवृत्त पुरवठा निरीक्षक श्री दुकळे व प्रसिद्ध धान्य व्यापारी मामा ईनामके यांचे शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.धनगर सेवा संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.यावेळी धनगर सेवा संघाचे सचिव रमेश टिक्कल,उपाध्यक्ष अशोक घोलप,यशवंत सेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण थोरात,विजय हाळनोर,संतोष चोपडे,चंदुमामा ढोणे,कैलास शेळके,हमाल पंचायतचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.कोरोना आजार लवकर दुर व्हावा या साठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close