जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव शहरातील रस्त्याचे काम ढिसाळ,नागरिकांची तक्रार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील जास्त दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा संभाजी महाराज पुतळा ते गोकुळनगरी ते टाकळी नाका येथून सुरु होणारा इंदीरा पथ या रस्त्याचे काम नुकतेच संपन्न झाले असले तरी या कामाच्या लगेच तक्रारी सुरु झाल्या असून या रस्त्यावर साईड पट्ट्यांची कामे काळजीपूर्वक झाली नसून रस्त्यातील अडथळे तसेच असल्याने यावर अपघातांची मालिका सुरु झाली असल्याची तक्रार उमाकांत धुमाळ यासह नागरिकांनी केली आहे.

“कोपरगाव शहरातील इंदिरापथ हा छत्रपती संभाजी पुतळ्यापासून सुरु होणारा मार्ग असून त्याचे काम डिसेंबरच्या मध्यावर नुकतेच झाले आहे.मात्र यात संबंधित ठेकेदाराने साईड पट्ट्यांची कामे बऱ्याच ठिकाणी धरसोड पद्धतीने केली आहे.सदर रस्त्यावर अडथळा ठरणारे महावितरण कंपनीचे विद्युत पोल तसेच ठेवून काम करण्यात आले आहे.त्यामुळे सदर ठिकाणी अपघात होण्यास प्रारंभ झाला आहे”-उमेश धुमाळ,जेष्ठ कार्यकर्ते,कोपरगाव.

कोपरगाव शहरातील इंदिरापथ हा छत्रपती संभाजी पुतळ्यापासून सुरु होणारा मार्ग असून त्याचे काम डिसेंबरच्या मध्यावर नुकतेच झाले आहे.मात्र यात संबंधित ठेकेदाराने साईड पट्ट्यांची कामे बऱ्याच ठिकाणी धरसोड पद्धतीने केली आहे.सदर रस्त्यावर अडथळा ठरणारे महावीतरण कंपनीचे विद्युत पोल तसेच ठेवून काम करण्यात आले आहे.त्यामुळे सदर ठिकाणी अपघात होण्यास प्रारंभ झाला आहे.या बाबत पालिकेला वारंवार कळवूनही उपयोग झाला नाही अशी तक्रार धुमाळ यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना शिष्टमंडळ नुकतेच भेटले असून त्यांनी याबाबत सत्वर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सदर प्रसंगी दिलीप महापुरे,राजीव सुपेकर,दिलीप औताडे,राजू पिंजारी,शिरीष राजपूत,एकनाथ वाघ,आदीं मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close