जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावातील एकोणाविस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा तिचे घर व महाविद्यालयाकडे जाताना पाठलाग करून तसेच भ्रमणध्वनिवरून लज्जा उत्पन्न होईल असे संदेश पाठवून विनयभंग करणारा आरोपी मयूर राजेंद्र शिरसाठ (वय-२१) रा.गांधी चौक मेन रोड कोपरगाव याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.मात्र कोरोना साथीमुळे महाविद्यालय बंद असल्याने ती घरीच आहे.त्याचा गैर फायदा घेत आरोपी मयूर शिरसाठ हा महाविद्यालयात जात असताना व घरी असताना व तिची इच्छा नसताना तिचा पाठलाग करून तिच्याशी वैयक्तिक सलगी वाढविण्यासाठी भ्रमणध्वनी वरून तिला आक्षेपार्ह संदेश पाठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन वारंवार करीत आहे.त्याला वेळोवेळी समजावूनही काही उपयोग झाला नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील सप्तर्षी मळ्यात तक्रारदार महाविद्यालयीन तरुणी आपल्या कुटुंब कबिल्यासोबत रहाते.वडील सराफीचा व्यवसाय करून आपला जिवन चरितार्थ चालवतात.तक्रारदार तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.मात्र कोरोना साथीमुळे महाविद्यालय बंद असल्याने ती घरीच आहे.त्याचा गैर फायदा घेत आरोपी मयूर शिरसाठ हा महाविद्यालयात जात असताना व घरी असताना व तिची इच्छा नसताना तिचा पाठलाग करून तिच्याशी वैयक्तिक सलगी वाढविण्यासाठी भ्रमणध्वनी वरून तिला आक्षेपार्ह संदेश पाठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन वारंवार करीत आहे.त्याला वेळोवेळी समजावूनही काही उपयोग झाला नाही.आज दुपारी ३.३३ वाजेच्या सुमारास त्याने,”तू फोन घेतला नाही तर मी तुझ्या घरापुढे दारू पिऊन येऊन धिंगाणा घालील अशी धमकीच दिली वैगरे तिच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी मयूर शिरसाठ याचे विरुद्ध भा.द.वि कलम ३५४(ड)(२),५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close