जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोविड केअर सेंटर साठी उपचार साहित्य प्रदान

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी आ.आशुतोष काळे यांनी कोरोना उपचार साहित्य नुकतेच प्रदान केले आहे.त्यात १८० ऑक्सिमीटर,१०० फेस शिल्ड मास्क,१००० सर्जिकल हँड ग्लोव्हज,१००० मास्क,२५ लिटर हँड सॅनिटायझर,२०० डिस्पोजेबल कॅप,१० इन्फ्रारेड थर्मामीटर आदींचा समावेश आहे.त्यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यातही कोरोनामुळे दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्याला लवकर आला बसेल अशी स्थिती आज तरी संभाव्य वाटत नसल्याने प्रशासन सावध झाले आहे.त्यावर आगामी काळात तपासण्या व उपचार साधने,दवाखाने वाढविणे आरोग्य कर्मचारी वाढविणे सरकारच्या हाती दिसत आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २ हजार ६५७ ने वाढून ती १ लाख ४१ हजार १९३ इतकी झाली असून ४०५६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ५० हजार २३१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७३ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्याला लवकर आला बसेल अशी स्थिती आज तरी संभाव्य वाटत नसल्याने प्रशासन सावध झाले आहे.त्यावर आगामी काळात तपासण्या व उपचार साधने,दवाखाने वाढविणे आरोग्य कर्मचारी वाढविणे सरकारच्या हाती दिसत आहे.कोपरगाव शहर व तालुक्यात १० एप्रिल नंतर रुग्ण आढळला नाही हे जरी खरे दिसत असले तरी हि स्थिती सातत्याने राहील याची कुठलीही खात्री देता येत नसल्याने प्रशासन सावधपणे वाटचाल करीत आहे.याचाच हा पुरावा असून आ. काळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या चीज वस्तू खरेदी केल्या आहेत.

यावेळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकरराव थोपटे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गांगुले,नगरसेवक मंदार पहाडे,सुनील शिलेदार आदी मान्यवर सुरक्षित अंतर राखून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close