कोपरगाव तालुका
चारित्र्यशील उमेदवारालाच लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पाठवा
अण्णा हजारे यांचे मतदारांना आवाहन
पारनेर( प्रतिनिधी) -पक्ष पार्ट्यांमुळे लोकशाहीचे मोठे नुकसान होवुन समाजामध्ये गट तट होवुन लोकशाहीचे मोठे नुकसान झाले आहे शिवाय पक्ष पार्ट्यांचा घटनेमध्ये कुठेही उल्लेख नाही त्यामुळे जो उमेदवार लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये पाठविण्यासाठी मतदान यंत्रावरिल चारित्र्यशिल उमेदवाराचा फोटो पाहुनच मतदारांनी मतदान करावे.असे आवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यात जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांची प्रेरणा घेवुन पारनेर तालुक्यात आदर्श उपक्रम राबवुन लोकशाहीला बळकट करण्यासाठी शुद्ध आचार,शुद्ध विचार,निष्कलंक जीवन,अपमान पचवायची शक्ती,जीवनात त्याग व राष्ट्र व समाजाच हित समोर ठेवुन समाजासाठी निस्वार्थ सेवा करणारा चारित्र्यशिल उमेदवारालाच लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पाठवण्यासाठी गावोगावी जावुन मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबवुन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचा संकल्प तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला व आण्णासाहेब हजारेंनी कार्यकर्त्यांना राळेगणसिद्धिमध्ये लोकसभेच्या पार्श्वभुमिवर मार्गदर्शन केले .
लोकसभेच्या पार्श्वभुमिवर मतदार मतदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातुन मोठी जनजागृती करुन एक आदर्श व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यासाठी पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आण्णांच्या आंदोलनामुळेच आज सर्वसामान्य मतदाराला उमेदवाराचा फोटो पाहुन मशिनवर मतदान करता येणार त्या यशाचे आण्णांच्या कार्याचे कार्यकर्त्यांनी ॠण व्यक्त केले व आण्णांनी यावेळी कार्यकर्त्यांना आपले मत व्यक्त करताना सांगितले की जो उमेदवार एक गाव आदर्श करुन निवडणुकीला उभा राहील त्याच्या पाठीशी मतदारांनी राहवे.आण्णांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन जागरुक मतदार हाच खरा लोकशाहीचा आधार या संकल्पनेनुसार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर,दत्ता आवारी,संदिप पठारे,सहदेव घनवट,मनोज तामखडे गणेश चत्तर ,शरद पवळेंनी तालुक्यात नियोजन बैठक ठेवुन नियोजीत आदर्श उपक्रम राबवण्यासाठी उपक्रमाची सुरुवात आण्णांचे मार्गदर्शन व आशिर्वाद घेवुन पवित्र कार्याला सुरुवात पवळे व खेडेकर यांनी वृत्तपत्राला सांगितले.