जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आता खरी संयमाची गरज

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात गर्दी टाळण्यासाठी विशिष्ट वार ठरवून देऊनही त्या जागेवर बसण्यास विरोध करून अपेक्षित जागेवर बसण्याचा आग्रह धरुन त्यातून नियमभंग करणाऱ्या मात्र त्या नाराजीतून संतप्त व्यापाऱ्यांनी काही काळ नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना अखेर सौम्य लाठीमार करावा लागल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली असून प्रकाराने मात्र पालिका आणि व्यापारी यांच्यात आपमेळ नसल्याचे उघड झाले आहे.दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी काही काळानंतर या व्यापाऱ्यांना पांगविण्यात यश मिळवले आहे.मात्र आता शहरात गोंधळ निर्माण करणारा हा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

एखादा राजकारणी लोकहितासाठी लोकप्रियतेकडे किती पाठ फिरवू शकेल.त्यास एकवेळ मर्यादा असतील पण लोकानुनयासाठी ते किती वाकू यास काही धरबंध असू शकत नाही.त्यातूनच कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता केवळ निवडणुका जिंकणे या आपल्याकडच्या कालातीत राजकीय संस्कृतीला आज तरी पर्याय नसल्याने त्या बाबतीत न बोललेच बरे !त्यातून नागरिकांनीच योग्य तो बोध घेतलेला बरा.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ३३० ने वाढून ती १ लाख ३२ हजार ७५५ इतकी झाली असून ३९०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४७ हजार १९० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १ हजार ५७७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७२ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही कोरोनाचे दोन बळी गेले आहे.त्या मुळें नागरिकांना स्वतःच्याच घरात कैद होण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गास आपल्या हातास काम नसल्याने किंवा घराबाहेर पडता येत नसल्याने मोठी आर्थिक कोंडी झाली आहे मात्र ती उघडपणे कोणाजवळ बोलता येत नाही.बोलल्यास आपली लांबी-रुंदी उघड होण्याची धास्ती वाटत आहे.या मानसिकतेतून वर्तमान कोंडी झाली आहे.अत्यावश्यक सेवा हि विशिष्ट वर्गापूरतीच मर्यादित असल्याने बाकी वर्गास हात चोळत बसण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.त्यामुळे हातातोंडाची गाठ पडणे दुरापास्त बनत चालले आहे.पर्यायाने हा वर्ग आता अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या सेवेत आपल्या हातांना काम शोधत आहे.त्यातच सर्वच स्तरातील नागरिकांना भाजीपाला व फळफळावळ हे साधेसोपे व्यवसाय आपल्या आवाक्यातील वाटत आहे.त्यातून या व्यवसायावर सर्वांच्या उड्या पडत आहे.शिवाय कोपरगाव शहर वगळता सर्वत्र अन्य गाव बाजार बंद असल्याने इतर वारी शहराच्या बाहेर जाणारे व्यापारी गावातच ठाण मांडून आहे.यातून सर्वांना आपापल्या कुटुंबाचा जीवन चरितार्थ चालण्याची आशा निर्माण झाली आहे.त्यातच कोपरगाव नगर परिषद आपल्या नागरीकांपासून कोरोना साथ कशी दूर राहील या प्रयत्नात तालुका व शहर प्रशासन आहे. शहरातील गर्दी टाळून आपले दैनंदिन व्यवहार कसे सुरु राहतील या साठी शहर प्रशासन प्रयत्नशील आहे.आता पर्यंत तालुक्यात दोन अपवाद वगळता नागरिकांच्या सहकार्याने त्यांना या बाबतीत यशही मिळाले आहे.

कोपरगाव तालुक्यातही कोरोनाचे दोन बळी गेले आहे.त्या मुळें नागरिकांना स्वतःच्याच घरात कैद होण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गास आपल्या हातास काम नसल्याने किंवा घराबाहेर पडता येत नसल्याने मोठी आर्थिक कोंडी झाली आहे मात्र ती उघडपणे कोणाजवळ बोलता येत नाही.बोलल्यास आपली लांबी-रुंदी उघड होण्याची धास्ती वाटत आहे.या मानसिकतेतून वर्तमान कोंडी झाली आहे.अत्यावश्यक सेवा हि विशिष्ट वर्गापूरतीच मर्यादित असल्याने बाकी वर्गास हात चोळत बसण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.

आता कोरोनाची विस्फोट होण्याची वेळ आल्याने प्रशासनावर आणखी मोठा दबाव वाढला आहे.मात्र नागरिकांना एकीकडे आपली भूक थांबू देत नाही तर काहींना नागरिकांचा स्वैर संचाराचा बंडखोर स्वभाव उफाळून येत असल्याने हा संघर्ष निर्माण झाला आहे.त्यासाठी दोन्ही बाजूनी संयम राखण्याची गरज निर्माण झाली आहे.याचाच अनुभव आज आला असून कोरोना काळात या पुढील काळ अजून अवघड जाणार आहे हि तर सुरुवात आहे.त्यामुळे यात राजकारणाची संधी कोणी शोधत असतील तर ती बाब शहर स्वास्थ्यासाठी नक्कीच धक्कादायक असेल.कोणताही संकटांचा काळ माणसाची परीक्षा घेत असतो ती वेळ आता कुठे सुरु झाली आहे.एखादा राजकारणी लोकहितासाठी लोकप्रियतेकडे किती पाठ फिरवू शकेल.त्यास एकवेळ मर्यादा असतील पण लोकानुनयासाठी ते किती वाकू यास काही धरबंध असू शकत नाही.त्यातूनच कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता केवळ निवडणुका जिंकणे या आपल्याकडच्या कालातीत राजकीय संस्कृतीला आज तरी पर्याय नसल्याने त्या बाबतीत न बोललेच बरे ! त्यातून नागरिकांनीच योग्य तो बोध घेतलेला बरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close