जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिक्षक समन्वय समितिच्या वतीने कोरोनासाठी १.२५ लाखांचा निधी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख २५ हजार रुपयांचा निधीचा धनादेश कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचे हस्ते नुकताच सुपूर्त करण्यात आला आहे.

सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या कोरोना संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे.त्यावर सरकार मोफत उपचार करत आहे.त्या साठी निधीची गरज आहे.ती गरज ओळखून सामाजिक दायित्व म्हणून कोपरगाव तालुका शिक्षक समन्वय समितीने हा निर्णय घेतला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देशभरात कोरोनाचे १ लाख २७ हजार रुग्ण आढळले आहे तर त्यातील ३ हजार ७५९ रुग्णाचे निधन झाले आहे.राज्यात कोरोनाची ४४ हजार ५८२ नागरिकांना लागण झाली असून या विषाणूने १५१७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७१ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही या आधीच कोरोनाचे दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे.त्यावर सरकार मोफत उपचार करत आहे.त्या साठी निधीची गरज आहे.ती गरज ओळखून सामाजिक दायित्व म्हणून कोपरगाव तालुका शिक्षक समन्वय समितीने हा निर्णय घेतला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर प्रसंगी जिल्हा शिक्षक बँकेच्या संचालक विद्युलता आढाव, शिक्षक समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक कानडे,विकास मंडळाचे विश्वस्त रमेश दरेकर, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष प्रमोद जगताप,गुरु माउली मंडळाचे शशी जेजूरकर,जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत वाडिले,राहुल भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close