जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरंगाव नजीक तीन जण संशयित पकडले,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नजीक मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक लुटीच्या दोन घटना घडल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस सतर्क झाले असून त्यांनी कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीं नजीक संशयित रित्या फिरणारे किरण सजन बोथरा (वय-३२) रा.औद्योगिक वसाहत,कोपरगाव,संजय खंडू घोडेराव ( वय-३४),संजीवनी गेटसमोर,नकुल माणिकराव जाधव (वय-३०) रा. चिंचोडी ता.येवला तिघेजण विविध ठिकाणी विविध वेळी पकडले असून त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने कोपरगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आता कुठे काही अंशी दुकाने उघडण्यास कोपरगाव शहर व तालुक्यात परवानगी मिळाली आहे.त्याचा फायदा घेत चोरट्यानी आपली हात की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.संजीवनी नजीक शिंगणापूर येथे एक किराणा दुकान फोडून मोठी चोरी करण्यात आली आहे.त्यामुळे सावध झालेल्या पोलिसांनी आता आपली वक्रदुष्टी चोरट्याकडे वळवली आहे.त्यामुळे गस्त वाढविण्यात आली आहे.शहर पोलीस आपल्या गस्तीवर असताना त्यांना प्रथम कोपरगाव औद्योगिक वसाहती नजीक सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हे तीन चोरटे संशयित रित्या आढळून आले आहे.

वर्तमानात कोरोनामुळे देशभर पोलीस आपल्या कोरोनाच्या बंदोबस्तात आहे.त्यामुळे सध्या भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचे फावल्याचे दिसत आहे.आधीच पोलीस बळ कमी असल्याने व त्यात गत सव्वा दोन महिन्यापासून कोरोना बंदोबस्त या मुळे पोलिसांचे मनोधैर्य खचत चालले आहे.त्यांना दिलासा देण्यासाठी आता स्वयंसेवक समोर आले हि समाधानाची बाब आहे.हे खरे असले तरीही गत दोन महिने आर्थिक दुर्बल घटकांच्या व मध्यम वर्गीय नागरिकांच्या हाताला काम नाही.त्यातच मध्यम वर्गाला काम नसल्याने धड सांगताही येत नाही.व घरात काही शिधापाणी शिल्लक नाही हे बोलता येत नाही असे अवघड जागेचे दुखणे बनले आहे.आता कुठे काही अंशी दुकाने उघडण्यास कोपरगाव शहर व तालुक्यात परवानगी मिळाली आहे.त्याचा फायदा घेत चोरट्यानी आपली हात की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.संजीवनी नजीक शिंगणापूर येथे एक किराणा दुकान फोडून मोठी चोरी करण्यात आली आहे.त्यामुळे सावध झालेल्या पोलिसांनी आता आपली वक्रदुष्टी चोरट्याकडे वळवली आहे.त्यामुळे गस्त वाढविण्यात आली आहे.शहर पोलीस आपल्या गस्तीवर असताना त्यांना प्रथम कोपरगाव औद्योगिक वसाहती नजीक सव्वा नऊ वाजेच्या सुमारास द्वाराकामाई दूध प्लांटच्या कंपनीच्या आडोशाला त्याच भागातील आरोपी किरण सजन बोथरा हा संशयित आढळून आला आहे.त्या नंतर त्याच रात्री साडे नऊच्या सुमारास संजीवनी कारखान्याच्या घेत समोर राहणारा दुसरा संशयित संजय खंडू घोडेराव हा बी.डी.एच.कंपनीचे आडोशाला आढळून आला आहे.तर तिसऱ्या घटनेत आरोपी नकुल माणिकराव जाधव हा रात्री पावणे दहाच्या सुमारास सिनगर स्टील फर्निचर कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला आढळून आला आहे.या बाबत पो.कॉ.राघू छबू कोतकर,अंबादास रामनाथ वाघ,यांनी या तिघांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.अनुक्रमे १८१,१८२,१८३/२०२० मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.ए. एम.दारकुंडे,हे करीत आहेत.या घटनेने कोअँर्गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close