संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनामुळे सर्वत्र बंदचे वातावरण आहे.शाळांना कुलपे लागली आहे.या प्राप्त परिस्थितीत आता शाळांचे निकाल जाहीर करणे हि बाब अवघड बनली असताना आता या बाबत कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेने त्यावर उपाय शोधून काढला आहे.सर्च बॉक्समध्ये विद्यार्थ्यांचे नाव किंवा इयतेचा कोड नंबर टाकून आपला निकाल पाहण्याची व डाऊनलोड करण्याची सुविधा सोप्या पद्धतीने पालकांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे.मुख्याध्यापिका प्रियंका जोशी,अनुज ढुमणे,सुदाम साळुंके या शिक्षकांनी पालकांचा ग्रुप तयार करून त्यावर दररोजचा अभ्यास दिला जात आहे. यात सहभागी विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करून शिक्षकांना पाठवत आहे.व शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत.तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून घेतला जात आहे.या आधुनिक तंत्रज्ञानाची शिक्षणात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण झाली आहे.आता प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल तयार करून शाळेच्या वेबसाइटवर ऑनलाईन प्रसिद्ध केला आहे.शाळेतील शिक्षकांच्या या उपक्रमाचे गिरमेवस्ती पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.