जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या परीचारिकेचे कोपरगावात स्वागत

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुभद्रानगर या उपनगरातील परिचारिका वैशाली वसंत नन्नवरे ह्या गत ४५ दिवसापासून मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात कोरोना विरुद्धच्या लढाईत परिचारिका म्हणून आपले योगदान देऊन परत आल्याने त्यांचे एकात्मता तरुण मंडळ व श्री साई समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव शहरात जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर या रुग्णांची सेवा करणे म्हणजे मोठे जोखमीचे काम ठरले आहे.या प्राप्त परिस्थितीत डॉक्टर,परिचारिका,पोलीस,शिक्षक त्यांना साहाय्य करणाऱ्या आशा सेविका,अंगणवाडी सेविका आदी आपला जीव धोक्यात घालून देशसेवा करीत आहेत हि बाब निश्चिंतच अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८२२ हजारने वाढून ती ८६ हजार ६७८ इतकी झाली असून २७६० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २९ हजार १०० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १०६८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७१ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर या रुग्णांची सेवा करणे म्हणजे मोठे जोखमीचे काम ठरले आहे.या प्राप्त परिस्थितीत डॉक्टर,परिचारिका,पोलीस,शिक्षक त्यांना साहाय्य करणाऱ्या आशा सेविका,अंगणवाडी सेविका आदी आपला जीव धोक्यात घालून देशसेवा करीत आहेत हि बाब निश्चिंतच अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे.त्यांचे हे महत्वपूर्ण कार्य ओळखून कोपरगावात त्या आल्यावर शहरातील नागरिक,महिला यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले आहे.

आज देशातील बहुतांशी नागरिक सुखरुप आहोत यात या सर्व आरोग्य दूतांचा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच वैशाली नन्नवरे यांनी कोरोनाविरुद्धच्या या लढाईत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकात्मता तरुण मंडळ व श्री साई समर्थ प्रतिष्ठाण यांनी त्यांचे सुरक्षित अंतराचा नियम पाळून जोरदार स्वागत केले.या वेळी बहुसंख्य नागरिक,महिला उपस्थित होत्या.या मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close