जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

टायर दुकान फोडून लाखांची चोरी,कोपरगावात तक्रार दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या व्यापारी संकुलात संजय नाईक यांच्या मालकीच्या असलेल्या “बबलू टायर ” हे दुकान टाळेबंदीत बंद असताना दुकानांचे हॅन्डरफ तोडून त्यातील विविध वाहनांचे ४४ टायर व १०० ट्यूब अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची बाब दुकानांचे मालक हे रवंद्याहून आपल्या दुसऱ्या कामासाठी आले असताना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या व्यापारी संकुलात असलेल्या बबलू टायर या दुकांचे अज्ञात वेळी कोणी पाहत नाही हि संधी साधत दुकानांचे हॅन्डरफ तोडून दुकानात प्रवेश मिळवून दुकानातील आपे रिक्षा टायर ३ नग,छोटा हत्ती ४ नग,दुचाकीची ३७ नग,व दुचाकीच्या १०० नग ट्युबा असा जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.या बाबत रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व व्यापारी संजय नाईक हे आपल्या ट्रॅक्टरचे काही सुटे भाग घेण्यासाठी कोपरगावात आले असता त्यांच्या हि बाब लक्षात आली आहे.

देशभरात व राज्यात कोरोना साथीने कहर केलेला असल्याने नगर जिल्ह्यासह राज्यात अजुनही काही भागात टाळेबंदी सुरूच आहे.नेमक्या या बाबीचा चोरट्यानी फायदा उठवला असून कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या व्यापारी संकुलात असलेल्या बबलू टायर या दुकांचे अज्ञात वेळी कोणी पाहत नाही हि संधी साधत दुकानांचे हॅन्डरफ तोडून दुकानात प्रवेश मिळवून दुकानातील आपे रिक्षा टायर ३ नग,छोटा हत्ती ४ नग,दुचाकीची ३७ नग,व दुचाकीच्या १०० नग ट्युबा असा जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.या बाबत रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व व्यापारी संजय नाईक हे आपल्या ट्रॅक्टरचे काही सुटे भाग घेण्यासाठी कोपरगावात आले असता त्यांच्या हि बाब लक्षात आली आहे.त्यांनी या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.या घटनेने कोपरगाव परिसरातील दुकानदारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close