जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आता पोलिसांना स्वयंसेवकांची मदत !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर आपल्या कर्तव्याचा वाढलेला अतिरिक्त ताण दूर करण्यासाठी आता कोपरगाव येथील ३० भाजप वसंत स्मृती कार्यालय व राष्ट्रीय स्वयंसेवकांनी मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याची नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडून प्राप्त झाली आहे.या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

हे गस्ती पथक दिवस रात्रीच्या सुमारास बारा तास आपले कर्तव्य बजावणे,नागरिकांना मास्क लावण्यास प्रोत्साहित करणे,थुंकण्यास प्रतिबंध करणे,जनतेत जनजागृती करणे आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे.त्यातून टाकळी फाटा,खडकी फाटा,येवला नाका, साईबाबा कॉर्नर,बस स्थानक परिसर,संभाजी चौक आदी ठिकाणी हे कार्यकर्ते आपली सेवा बजावत आहेत.विशेष म्हणजे या स्वयंसेवकांत नगराध्यक्ष विजय वहाडणे हे स्वतः काम करत आहेत.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २०७० ने वाढून ती ५१ हजार ४७५ इतकी झाली असून १७३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १२३३ने वाढून १६ हजार ७५८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.येवला शहरात नुकतेच सोळा रुग्ण आढळून आल्याने नजीकच्या तालुक्यासह कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून राज्यात ४१४ पोलीस कर्मचारी अशी ४२ पोलीस अधिकारी कोरोना साथीला बळी पडले आहेत.व पडत आहे.तर चार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.त्यातून या कोरोना योध्याना दिलासा मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांना तसा आदेश प्राप्त झाला असल्याने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी हा निर्णय घेतला आहे.त्यातून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व भाजप कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असून ३० त्यांची सेवा कोपरगाव शहर पोलिसानी स्वीकारली आहे.त्यांना कोपरगाव शहर पोलिसानी तशी ओळखपत्रे तयार करून दिली आहे.व त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली आहे.दिवस रात्रीच्या सुमारास गस्ती पथकात बारा तास आपले कर्तव्य बजावणे,नागरिकांना मास्क लावण्यास प्रोत्साहित करणे,थुंकण्यास प्रतिबंध करणे,जनतेत जनजागृती करणे आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे.त्यातून टाकळी फाटा,खडकी फाटा,येवला नाका, साईबाबा कॉर्नर,बस स्थानक परिसर,संभाजी चौक आदी ठिकाणी हे कार्यकर्ते आपली सेवा बजावत आहेत.विशेष म्हणजे या स्वयंसेवकांत नगराध्यक्ष विजय वहाडणे हे स्वतः काम करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close