जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या मतदारसंघात विविध विकास कामांसाठी 2.10 कोटींचा निधी मंजूर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील रस्ते,पूल आणि नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी पंधरा कामासाठी २ कोटी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीमुळे ग्रामीण भागातील रस्ते व पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान यात काकडी येथे चर्च व लक्ष्मीआई मंदिरासमोर सभामंडप बांधणे,कासली येथे कासली दहेगाव रस्ते ते बागुल वस्ती रस्ता करणे,चितळी येथे इकबाल इनामदार घर ते अरुण मुंडे घर रस्ता,जेऊर पाटोदा येथे प्रजीमा-८ ते चैतन्यनगर रस्ता व जैस्वाल वस्ती अंतर्गत बंदिस्त गटार करणे,टाकळी येथे किरण पाईक घर ते बापूसाहेब बोरावके घर रस्ता,डाऊच बु.येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप उभारणे,तिळवणीसह आदी पंधरा कामांचा समावेश असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

   भारतातील वाढत्या नागरीकरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शहरांचा पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पुढील १५ वर्षांत ८४० अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक निधीची गरज आहे.हा निधी पाणीपुरवठा,स्वच्छता,घनकचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी सुविधांच्या प्रकल्पांसाठी वापरला जात असतो.कोपरगाव शहरात या निधीची वानवा असून त्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहे.ती उणीव भरून काढण्यासाठी आ.काळे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला होता त्याला यश येताना दिसून येत आहे.त्यातून काकडी,कासली, चितळी,जेऊर पाटोदा,टाकळी,डाऊच बु.,तिळवणी,धामोरी,धारणगाव,मळेगाव थडी,संवत्सर,सडे,ब्राम्हणगाव,वाकडी आणि माहेगाव देशमुख या गावांतील विविध विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.

   दरम्यान यात काकडी येथे चर्च व लक्ष्मीआई मंदिरासमोर सभामंडप बांधणे,कासली येथे कासली दहेगाव रस्ते ते बागुल वस्ती रस्ता करणे,चितळी येथे इकबाल इनामदार घर ते अरुण मुंडे घर रस्ता,जेऊर पाटोदा येथे प्रजीमा-८ ते चैतन्यनगर रस्ता व जैस्वाल वस्ती अंतर्गत बंदिस्त गटार करणे,टाकळी येथे किरण पाईक घर ते बापूसाहेब बोरावके घर रस्ता,डाऊच बु.येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप उभारणे,तिळवणी येथे अशोक काशिनाथ शिंदे घर ते रमेश सूर्यभान शिंदे घर रस्ता व संतोष ज्ञानदेव शिंदे घर ते पगारे वस्ती पाण्याच्या टाकीपर्यंतचा रस्ता,धामोरी येथे नवनाथनगर आनंदवली ते भास्कर कुऱ्हाडे घर रस्ता,धारणगाव येथे अनिल डांगे घर ते मंडपी नाला रस्ता व शिवाजी चौधरी शेत ते अनिल डांगे घर रस्ता,मळेगाव थडी येथे एमडीआर ४ ते संदीप उत्तम शिंदे वस्ती रस्ता,संवत्सर येथे पुंडलिक कर्पे घर ते नानासाहेब जाधव वस्ती व शिवाजी फटांगरे वस्ती ते विजय भोसले वस्ती रस्ता,सडे येथे चांगदेव बारहाते वस्ती ते चानखन बाबा मंदिर रस्ता, ब्राम्हणगाव येथे पैठणकर घर ते पांडुरंग सोनवणे घर रस्ता व अशोक आसने घर ते पैठणकर घर रस्ता, वाकडी येथे वाकडी-संभाजीनगर रस्त्यावर स्वामी विवेकानंद शाळेजवळ पूल बांधणे,माहेगाव देशमुख येथे राज्य मार्ग ७ ते माहेगाव देशमुख रस्ता या विकास कामांसाठी प्रत्येकी १० लाखप्रमाणे एकूण २.१० कोटी  निधी मंजूर झाला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close