विविध पक्ष आणि संघटना
बाळासाहेब सेनेचे…या शहरात बैठकीचे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली आहे.
सदर बैठक दुपारी ०३ वाजता संपन्न होणार आहे.सदर बैठकीस बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी,युवासेना,महिला अघाडी,शेतकरी सेना,मागासवर्गीय सेल,अध्यात्मिक अघाडी,व्यापारी अघाडी,अल्पसंख्याक सेल,आदिसह विविध सेलचे जिल्हाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,शहरप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकानी उपस्थित रहावे असे आवाहन कमलाकर कोते यांचे सह संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,बाजीराव दराडे,जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर आदींनी शेवटी केले आहे.