नगर जिल्हा
..या जि.प.शाळात कोरोनामुळे आता ऑनलाइन प्रवेश
संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात कोरोनोपासून बचाव करण्यासाठी सरकार विविध उपाय करत असून या साथीमुळे शाळा,महाविद्यालये बंद झाली आहेत ते कसे सुरु करायचे याचा विचार सुरु असताना काही शाळांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून घेण्यासाठी सुरुवात केली आहे.राहाता तालुक्यातील लोहगाव जिल्हा परिषद शाळेत तशी सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनामुळे नागरिकांना शासन घराबाहेर पडू देत नाही अन्य नागरिकांना या कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सामाजिक अंतराची सक्ती केली जात आहे व ती रास्तही आहे. त्यासाठी या जिल्हा परिषद शाळेने पालकांना आवाहन केले होते.त्या माहितीसाठी मोबाईल नंबर देण्यात आले आहे. राहाता तालुक्यात प्रथमच या वर्षी लोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
राज्यात कोरोनामुळे नागरिकांना शासन घराबाहेर पडू देत नाही अन्य नागरिकांना या कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सामाजिक अंतराची सक्ती केली जात आहे व ती रास्तही आहे. त्यासाठी या जिल्हा परिषद शाळेने पालकांना आवाहन केले होते.त्या माहितीसाठी मोबाईल नंबर देण्यात आले आहे. राहाता तालुक्यात प्रथमच या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे सध्या देशात व राज्यात कोरोणामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालये बंद आहे. जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात सर्वत्र बंद आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आल्या आहे. मात्र पुढच्या वर्षी शैक्षणिक प्रवेशाचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठी शाळेने पालकांना आवाहन केले होते. सर्व विद्यार्थ्यांना कोणाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या घरी राहण्यास सांगितले आहे मात्र शिक्षकांना दरवर्षीप्रमाणे गावात किंवा घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांची व पालकांची जागृती करणे या बाबी शक्य नाही. त्यामुळे गर्दी टाळून ऑनलाईन फॉर्म भरून प्रवेश दिला जात आहे.टाळेबंदी नियमाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.
लोहगाव जिल्हा परिषद शाळेत स्पर्धा परीक्षा, कला व क्रीडा मार्गदर्शक,पहिली ते पाचवी चे वर्ग उच्च शिक्षक अध्यापन वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य सर्व मुली व मागास प्रवर्गातील मुलांना मोफत प्रवेश शाळेत पोषण आहार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम विविध शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ, डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर, स्वतंत्र वाचनालय व ग्रंथालय शाळेसाठी ह्या सुविधा उपलब्ध आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती डिंबर मॅडम,मेहेर सर,कदम सर, श्रीमती चेचरे मॅडम, झरेकर मॅडम, साळुंके मॅडम,श्री अंत्रे सर आदी शिक्षक परिश्रम घेत आहे.
.