जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पत्रकार जवरे यांचे घरी खा.वाकचौरे यांची सांत्वनपर भेट

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

चांदेकसारे -(किसन पवार)
 

निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री गं.भा.गंगुबाई जयराम जवरे (वय-८२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले असताना नुकतीच त्यांचे जवळके येथील घरी जवरे वस्तीवर शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट दिली आहे.

“स्व.गंगुबाई जवरे या मातेने अत्यंत कष्टातून आपल्या मुलांना सुसंस्कारित करून त्यातून पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या सारख्या सुपुत्रास जन्म दिल्यानेच त्यांनी अभ्यासपूर्ण लढा देऊन सत्ताधाऱ्याविरुध्द रस्त्यावरील व न्यायिक संघर्ष केला आहे.त्यामुळे शिर्डी विमानतळासह, तर गतवर्षी नगर नाशिक जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना पाणी पाहावयास मिळाले आहे”- ऍड.अजित काळे,माजी अध्यक्ष,उच्च न्यायालय,वकील संघ,छ.संभाजीनगर.

  

स्व.गंगुबाई जयराम पा.जवरे.

स्व.गंगुबाई जवरे यांचे मंगळवार दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६.१७ वाजता निधन झाले होते.त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे,नानासाहेब गाढवे,सरपंच सारिका विजय थोरात,उत्तमराव जोंधळे,माजी पंचायत सदस्य बाळासाहेब रहाणे,भाजप तालुकाध्यक्ष सरपंच कैलास रहाणे,माजी सरपंच वसंत थोरात,प्रल्हाद जवरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व आप्तस्वकीय उपस्थित होते.

   दरम्यान ही घटना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना समजली त्यावेळी ते परराज्यात होते.त्यांनी विमानतळावर आल्यावर पहिल्यांदा पत्रकार जवरे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले आहे.त्यांचे समवेत ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष मुकुंद शिनगर,जलसंपदाचे माजी उपभियंता एस.के.थोरात,म्युटसिलचे संचालक अशोक भागवत,महसूल विभागाचे बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

   सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी,स्व.गंगुबाई जवरे या मातेने अत्यंत कष्टातून आपल्या मुलांना सुसंस्कारित करून त्यातून पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या सारख्या सुपुत्रास जन्म दिल्यानेच त्यांनी अभ्यास पूर्ण लढा देऊन सत्ताधाऱ्याविरुध्द रस्त्यावरील व न्यायिक संघर्ष केला आहे.त्यामुळे शिर्डी विमानतळासह,जवळके परिसरात २७ वर्षापूर्वी सव्वा लाख वृक्ष लागवड करून गाव आदर्श होण्याचे प्रयत्न केले आहे तर गतवर्षी नगर नाशिक जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना हे पाणी मिळाले आहे.आगामी काळात कालवा कृती समिती आणि शेतकरी संघटना एकत्र लढणार असून आगामी वितरण व्यवस्था पूर्ण करणार आहे.आम्ही त्यांना राज्य पातळीवर प्रसिध्दी प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली असून त्यातून नक्कीच ते शेतकऱ्यांना न्याय देतील असा विश्वास व्यक्त करून स्व.गंगुबाई जवरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

   सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे रुपेंद्र काले.गंगाधर रहाणे,उत्तमराव जोंधळे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close