जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगाव तालुक्यातील…या शाळेचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
गोधेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एस.एस.सी.मार्च २०२१-२२ चा निकाल ८९.६५ % लागलेला असून ५८ विद्यार्थ्यांपैकी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ५ लाख ७० हजार ०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत.दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल जाहीर झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुलचा निकाल हाती आला असून या विद्यालयातून प्रथम तीन आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक – धनंजय भाऊसाहेब भाटे.एकूण गुण ४४३,टक्केवारी ८८.६० %. द्वितीय क्रमांक- कु.गौरी विनोद रांधवणे.एकूण गुण ४०३, टक्केवारी ८०.६०%.तृतीय क्रमांक- कु.नेहा विठ्ठल गव्हाळे एकूण गुण ३९२,टक्केवारी ७८.४०%.उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मुख्याध्यापक माळी जे.एस,स्कूल कमिटी सदस्य माधवराव रांधवणे व प्रकाश शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close