शैक्षणिक
कोपरगावातील…या शाळेचा निकाल ९५.०९ टक्के

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयातील शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तो ९५.०९% लागलेला असून ०० विद्यार्थ्यांपैकी ०० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ५ लाख ७० हजार ०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत.दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल जाहीर झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाचा निकाल हाती आला असून या विद्यालयातून प्रथम तीन आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक-कु.निकिता गोविंद थोरात,एकूण टक्केवारी ८४.२० %. द्वितीय क्रमांक- कु.नेहे धनश्री बाबासाहेब टक्केवारी ८२.४०%.तृतीय क्रमांक- कोल्हे विशाल राजेंद्र टक्केवारी ८१.८०%.उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थाचालक,मुख्याध्यापक,स्कूल कमिटी सदस्य,माजी सरपंच वसंत थोरात,उपसरपंच विजय थोरात,सदस्य प्रकाश थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.