शैक्षणिक
…या महाविद्यालयात आधार नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात भारतीय डाक विभाग आणि महाविद्यालय प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्याने इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच आधार नोंदणी व अद्ययावतीकरण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.या शिबिराचा सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी आधार कार्डावरील माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे.ही बाब लक्षात घेऊन इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच आधारविषयक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्याबद्दल पालक विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला एस.एस.जी.एम.कॉलेजचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे,श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक जनवाडे,श्री.केंद्रे आणि कोपरगावचे पोस्टमास्तर रवींद्र परदेशी,प्रसाद वसमतकर आदींचे सहकार्य लाभले होते.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी आधार कार्डावरील माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे.ही बाब लक्षात घेऊन इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच आधारविषयक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र हिंगे,पर्यवेक्षक माधव रेवगडे,कला,वाणिज्य व विज्ञान विभागांचे विभागप्रमुख,यु-डायस प्लस समिती अध्यक्ष संदिप सोनवणे आदींनी सहकार्य केले आहे.महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शिबिराचे कामकाज सुरळीतपणे पार पडले आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच आधारविषयक सेवा मिळाल्याने त्यांचा वेळ,श्रम आणि प्रवासखर्च वाचला.या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी समाधान यक्त केले आहे.विद्यार्थ्यांच्या सोयीला प्राधान्य देत शैक्षणिक संस्था आणि शासकीय विभागांनी परस्पर सहकार्याने असे उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध होऊ शकतात हे या शिबिरातून अधोरेखित झाले आहे.



