जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयातील प्राध्यापिकेने केले विकसित केले ‘डिजिटल टायट्रेटर’

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव येथील येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा.चंचल प्रीतीश विभुते यांनी विकसित केलेल्या ‘डिजिटल टायट्रेटर’ या उपकरणाच्या डिझाईनचे पेटंट नुकतेच भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आले आहे.त्यांच्या या संशोधनात्मक कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या प्रा.चंचल प्रीतीश विभुते यांनी विकसित केलेल्या ‘डिजिटल टायट्रेटर’ या उपकरणाबदल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

   प्रा.विभुते यांनी सांगितले की,प्रयोगशाळेतील गरज लक्षात घेऊन विकसित केलेल्या या उपकरणाचे डिझाईन भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते.त्यास मान्यता मिळून त्याचे प्रकाशन झाले आहे.पारंपरिक प्रयोग पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

   रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत पदार्थांचे विश्लेषण व सांद्रता निश्चित करण्यासाठी टायट्रेशन महत्त्वाचे आहे.पारंपरिक पद्धतीत मानवी निरीक्षणामुळे रीडिंगमध्ये त्रुटी होण्याची शक्यता असते.ही बाब लक्षात घेऊन प्रा.चंचल विभुते यांनी अचूक मोजमापासाठी ‘डिजिटल टायट्रेटर’ उपकरण विकसित केले आहे.हे उपकरण विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांपासून संशोधन प्रयोगशाळेपर्यंत उपयुक्त ठरणार असल्याची माहिती प्राचार्य प्रो.डॉ.विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

    प्रा.विभुते यांनी सांगितले की,प्रयोगशाळेतील गरज लक्षात घेऊन विकसित केलेल्या या उपकरणाचे डिझाईन भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते.त्यास मान्यता मिळून त्याचे प्रकाशन झाले आहे.पारंपरिक प्रयोग पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा हा प्रयत्न असून,उपकरणाच्या निर्मितीत श्रीमती चारुशीला पवार,डॉ.प्रांजल दाते व डॉ.पूनम पाटील यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.

    याप्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एन.टी.ढोकळे म्हणाले की,“महाविद्यालयातील अध्यापनासोबतच संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.प्रा.चंचल विभुते यांनी विकसित केलेल्या डिजिटल टायट्रेटरच्या डिझाईनचे पेटंट प्रकाशित होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असून,या संशोधनामुळे विद्यार्थ्यांना आणि इतर संशोधकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.”

   प्रा.चंचल विभुते यांच्या या उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे तसेच रसायनशास्त्र विभागातील प्रा.सदाशिव नगरे,डॉ.एस.जी.कोंडा आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close