शैक्षणिक
कु.समृद्धी थोरात एम.बी.बी.एस.उत्तीर्ण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर प्रदेश सरकारच्या अटलबिहारी आरोग्य विज्ञान विद्यापीठ लखनौ या विद्यापीठाचे जी.एस.मेडिकल कॉलेज गाझियाबाद एम.बी.बी.एस.चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील मूळ जवळके येथील रहिवासी व हल्ली राहाता येथे राहत असलेली कु.समृद्धी राजेंद्र थोरात हिने 1500 पैकी 1049 गुण (70 टक्के) विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाली आहे.तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.जवळके येथून मुलीमध्ये एम.बी.बी.एस.उत्तीर्ण होणारी ती दुष्काळी भागातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

अटलबिहारी आरोग्य विज्ञान विद्यापीठ लखनौ या विद्यापीठाचे जी.एस.मेडिकल कॉलेज गाझियाबाद या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या गाझियाबाद जी.एस.मेडिकल महाविद्यालयातून कु.समृद्धी थोरात हिने हे शिक्षण घेतले आहे.कु.समृद्धी थोरात ही जिल्हा शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र थोरात व शिक्षिका विद्या राजेंद्र थोरात यांची कन्या आहे.त्यांनी त्याला अतिशय प्रतिकूल स्थितीत हे शिक्षण दिले आहे.त्यांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठ (ए.बी.व्ही.एम.यू.) हे उत्तर प्रदेशातील लखनौ येथे स्थित एक प्रमुख राज्य सरकारी वैद्यकीय विद्यापीठ आहे.हे राज्यभरातील सर्व सरकारी आणि खाजगी वैद्यकीय,दंत,नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयांचे नियमन आणि संलग्नता करते.उत्तर प्रदेश विधानसभेच्या २०१८ च्या कायद्यानुसार (अधिनियम ४२) याची स्थापना झाली असून,२०२१ पासून हे विद्यापीठ पूर्णपणे कार्यरत आहे.राज्यातील सर्व वैद्यकीय आणि पॅरामेडिकल संस्था या विद्यापीठाशी संलग्न आहे.हे विद्यापीठ देशात मान्यताप्राप्त विद्यापीठ मानलं जात आहे.या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या गाझियाबाद जी.एस.मेडिकल कॉलेज मधून कु.समृद्धी थोरात हिने हे शिक्षण घेतले आहे.कु.समृद्धी थोरात ही जिल्हा शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र थोरात व शिक्षिका विद्या राजेंद्र थोरात यांची कन्या आहे.त्यांनी त्याला अतिशय प्रतिकूल स्थितीत हे शिक्षण दिले आहे.त्यांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान तिच्या या यशाबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,राज्य प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काळे,माजी उपअभियंता एस.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात यांचेसह तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.मूळ जवळके येथील भूमिपुत्र डॉ.शंतनु सरवार हे पहिले एम.बी.बी.एस.विद्यार्थी ठरले आहेत.ते कोपरगावात यशस्वी आरोग्य सेवा देत आहेत.


