शैक्षणिक
स्पर्धा परीक्षेत…या शाळेचे मोठे यश !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यस्तरीय डॉ.सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक ने यंदाही आपल्या झेंडा फडकवीला असून आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरूकुलाच्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.हि संख्या राज्यात सर्वाधिक आहे.सलग अकरा वेळा या शाळेने हि कामगीरी केली असल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली आहे.

“विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढविणे, विज्ञानाची आवड निर्माण करणे हा या परिक्षेचा मुख्य उद्देश आहे.आत्मा मालिक मध्ये ‘आत्मा मालिक पॅटर्न’ अंतर्गत विज्ञान विषयाचे विविध उपक्रम राबविले जातात.त्यामुळेच सलग अकराव्या वर्षी राज्यात या शाळेने सर्वोत्तम कामगीरी केली आहे”-नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष विश्वात्मक,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण.
डॉ.सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ही शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधक वृत्ती आणि प्रायोगिक कौशल्ये विकसित करण्यासाठी घेतली जाणारी एक अत्यंत लोकप्रिय परीक्षा आहे.या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागे करणे आणि त्यांना विज्ञान प्रयोगांकडे वळवणे असा उद्देश ठरविण्यात आला आहे.त्याला राज्यातील शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.कोकमठाण येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरूकुलाच्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांनी यात लक्षवेधी यश मिळवले आहे.
दरम्यान यात राज्य गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थी,जिल्हा गुणवत्ता यादीत २१ विद्यार्थी तर तालुका गुणवत्ता यादीत १०५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.त्यात सार्थक जोरवर, वैभवी जाधव,काळे स्वराली,सोहम बेद्रे,श्रेयस नलावडे,अंकित पाटील हे राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहे.तर भुषण ढोणे,नक्ष दिवे, राजवीर वाबळे,यश गवळी,सार्थक शिंदे, युवराज गर्जे,संकेत सपाटे,शाहू वाघमारे, आशिष बडे,स्वरांजली कानवडे,आराध्या बोर्हाडे,करण चरवंडे,साईराज गोर्डे,रोहित आंधळे,सुजितकुमार गोल्हार,धनेश पाटील, यश कनके,आरव नानेकर,प्रणव केदार,मयंक नाहिरे,हर्ष पवार यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत नाव चमकावले आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख सचिन डांगे,अनिल सोनवणे,बाळकृष्ण दौंड,रवींद्र देठे,मिना नरवडे,रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने,नयना आदमाने, सुनील पाटील,नितीन अनाप व विज्ञान विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.


