जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

लोकसेवा आयोग परीक्षा..या महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव  नजीक असलेल्या के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये लक्षवेधी यश मिळविल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी दिली आहे.महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील गणित विभागाचा विद्यार्थी प्रफुल्ल कुमावत याची विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली असून सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची विद्यार्थिनी स्नेहल आहेर हिची कर सहाय्यक (जी.एस.टी.) या पदावर निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कु.स्नेहल आहेर हिची कर सहाय्यक पदावर निवड.
 कोपरगाव येथील  के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने ध्येयपूर्ती अकॅडमीची स्थापना केलेली आहे.यावर्षी अकॅडमीच्या माध्यमातून आठ विद्यार्थी पोलिस बनले आहे.तसेच दोन विद्यार्थी महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स मध्ये निवडले आहेत.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

  महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे.मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यंदा कट-ऑफ विक्रमी लागल्याने परीक्षेतील स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.यावेळी हा निकाल जाहीर करण्यासाठी आयोगाने बराच वेळ घेतला आहे.तब्बल साडे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 

प्रफुल्ल कुमावत याची विक्रीकर निरीक्षक पदावर निवड.

  दरम्यान ही परीक्षा दिलेले उमेदवार आता पुढील तयारीला लागू शकतात.त्याला कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी अपवाद नाही.या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने ध्येयपूर्ती अकॅडमीची स्थापना केलेली आहे.यावर्षी अकॅडमीच्या माध्यमातून आठ विद्यार्थी पोलिस बनले आहे.तसेच दोन विद्यार्थी महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स मध्ये निवडले आहेत.यामध्ये विभागांतर्गत मयूर घोलप (ठाणे पोलीस) मुस्तकीन पिरजादे (मुंबई कारागृह पोलीस),फरदीन शेख (बुलढाणा पोलीस),अबूजर शेख (मीरा भाईंदर पोलिस) कु.स्वाती डोंगरे,कु.मेघा वाघमारे (बीड पोलीस), कु.आरती जगताप (छत्रपती संभाजीनगर पोलीस) आणि कु. प्रियंका गवळी (पुणे पोलीस) यांची महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झाली. तसेच महाविद्यालयातील कु.कांचन वाघमारे,कु.मोनाली कालेकर या विद्यार्थिनीची महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स (MSF) यामध्ये निवड झाली असल्याची माहिती ध्येयपूर्ती अकॅडमीचे संचालक डॉ.सुनील कुटे व प्रा.डॉ.वसुदेव साळुंके यांनी दिली आहे.

  दरम्यान विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अ‍ॅड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.विजय ठाणगे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close