शैक्षणिक
…या शाळेचा एस.एस.सी.निकाल जाहीर

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलचा दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात सलग ९ व्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला असून या निकालाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यात हर्षद नवनाथ जाधव ९९.६० % गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर दर्शील भरत अजमेरा ९९ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर अन्वी संजय उंबरकर ९८ % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान या निकालात ९० टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेत ७०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.विशेष म्हणजे समता इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहातील ६ विद्यार्थ्यांनी ९० % पेक्षा अधिक गुण मिळविले आहे.तर सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल काल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे.त्यात हे यश संपादक केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान यात दिक्षा प्रवीणकुमार दोषी ९६.८०%,प्रथमेश सुमित भट्टड ९६.६० %, सोहम बाबासाहेब साताळकर ९६ %,आर्यन भरत कुमार (९५.६०%), मानसी कैलास भुसारे ९५ %, नक्षत्रा जयसिंग मर्मट ९५% यांनी मोठे यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
दरम्यान दर्शील याला विज्ञान विषयात तर हर्षद याला इंग्रजी आणि आय.टी.या दोन्ही विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे.अजिंक्य दिलीप मुठे याने देखील इंग्रजी व आय.टी.या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहे.तर अन्वी संजय उंबरकर,दिक्षा प्रवीणकुमार दोषी,सोहम बाबासाहेब साताळकर,आर्यन भरत कुमार या यांनीही आय.टी. विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत यशाचा झेंडा रोवला आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या या यशाचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे,व्यवस्थापन समिती सदस्य,प्राचार्य समीर अत्तार सर्व शिक्षकवृंद,पालक आदींनी अभिनंदन केले आहे.