जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

..या शाळेचा परीक्षा निकाल ९० टक्के !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवडचा एस.एस.सी.परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून तो शेकडा निकाल ९० % एवढा लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

  

  फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये ०३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह,१२ प्रथम श्रेणी,१८ द्वितीय श्रेणी,तर १२ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळविली आहे.या विद्यालयात सर्वाधिक ८९.२०% गुण मिळवून कु.अनुराधा जयराम गवळी प्रथम आली आहे तर कु.गौरी दगडू सूर्यवंशी या विद्यार्थिनीने ७६.६०% गुण मिळवून द्वितीय व रितेश परागीर गोसावी या विद्यार्थ्याने ७६. ४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

   कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड,सचिव चैताली काळे,निरीक्षक नारायण बारे,मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांनी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close