जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

नवोदय परीक्षेत…या विद्यालयाचे मोठे यश !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला.यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुलच्या राजवीर कालेकर व जगदीश लोहकरे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

सलग आठराव्या वर्षी कोकमठाण येथीलआत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून आजपर्यंत ८३ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   सलग आठराव्या वर्षी आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून आजपर्यंत ८३ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.अभ्यासक्रमाचे नियोजन,जादा वर्ग,विविध चाचण्या,सराव चाचण्या,सुपर नाईट व सूवर्ण पहाट अभ्यासिका,स्मार्ट सण्डे उपक्रम,तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थी व शिक्षकांची अपार मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे.वर्षभर “मिशन पूनर्वैभव “राबविल्याने हे उद्दिष्ट साकार झाले असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले आहे.

    सदर यशस्वी विद्यार्थ्याना विभाग प्रमुख अनिल सोनवणे,सागर अहिरे,सचिन डांगे,रमेश कालेकर,रविंद्र देठे,मीना नरवडे,बाळकृष्ण दौंड,पर्यवेक्षक नयना शेटे,गणेश रासने,सुनिल पाटील,नितीन अनाप,विषय शिक्षक दिपक चौधरी,पंकज गुरसळ,विद्या खोसे यांचे मागदर्षन लाभले होते.

   या यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार  भंडारी,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,प्राचार्य निरंजन डांगे आदिंनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close