जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

साईबाबा संस्थांनचे माजी विश्वस्त बोरावके यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी व श्री साईबाबा संस्थांनचे माजी विश्वस्त प्रभाकर तथा पी.टी.बोरावके (वय-९३) यांचे सोमवारी राञी ११ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान स्व.बोरावके यांनी हिरो होंडा या कंपनीची डीलर शिप,हॉटेल व्यवसाय आदीं तही त्यांनी नाव कमावले होते.त्यांचा दुचाकीत जगभर व देशभर आघाडीवर असलेल्या हिरो कंपनीचे मालक मुंजाल घराण्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.शिर्डी येथे आल्यावर ते नेहमी बोरावके यांचे कडे येत असत.त्यांनी आपल्या कारकिर्दीत देशभरात अनेक आघाडीच्या साई भक्तांची सेवा केली होती.आपली मुले,नातवंडे यांना उच्च शिक्षित करून उद्योगासाठी परदेशात धाडले होते.

स्व.प्रभाकर बोरावके हे अत्यंत मितभाषी व अभ्यासू व्यक्तिमत्व होते.ते साठ-सत्तरच्या काळात राज्यभर गाजलेल्या गोदावरी-प्रवरा कँनाल खरेदी-विकी संघाचे संचालक,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष,शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आदी पदे भूषवली होती.त्यांच्या पश्चात नितीन बोरावके,अनिल बोरावके आदी दोन मुले आहे.तर पुण्याच्या माजी महापौर तथा माजी आ.दीप्ती चौधरी यांचे चुलते होते.

ते आपले जेष्ठ चिरंजीव अनिल बोरावके यांचे जावई निधन झाल्यावर हताश झाल्याचे पाहावयास मिळाले होते.त्यांचे वडील तुकाराम बोरावके हे शिर्डीचे साईबाबा यांच्या सहवासात आले होते.त्यांनी त्यांच्या हयातीत श्री साईबाबा समाधीवर स्वतःच्या शेतातील फुले वाहण्याचा नित्य क्रम सुरु ठेवला होता.तो प्रभाकर बोरावके यांनी आपल्या हयातीत पुढे चालवला होता.त्यांनी एक प्रगतशील शेतकरी,उद्योजक,व यावसायिक म्हणून आपल्या हयातीत नाव कमावले होते.साईगंगा मिनरल वॉटर हा त्याकाळी त्यांनी सर्वात आधी शुद्ध पाण्याचा प्रकल्प राबवला होता हा त्यांच्या दूरदृष्टीचा पूरावा होता.त्यानंतर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यात उडी घेतली होती.

दरम्यान त्यांनी याखेरीज हिरो होंडा या कंपनीची डीलर शिप,हॉटेल व्यवसाय आदीं तही त्यांनी नाव कमावले होते.त्यांचा दुचाकीत जगभर व देशभर आघाडीवर असलेल्या हिरो कंपनीचे मालक मुंजाल घराण्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.शिर्डी येथे आल्यावर ते नेहमी बोरावके यांचे कडे येत असत.त्यांनी आपल्या कारकिर्दीत देशभरात अनेक आघाडीच्या साई भक्तांची सेवा केली होती.

दरम्यान त्यांचा कोपरगाव येथील गोदावरीतिरी अमरधाम येथे आज सकाळी १०.३० वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने माजी आ.अशोक काळे,शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे.माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,विजय वहाडणे,साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,सुरेश वाबळे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close