जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

रेल्वेची धडक बसून तरुण ठार,कोपरगाव पोलिसांत अकस्मात नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नगर दौन्ड रेल्वे मार्गावर आज पहाटे १.३० वाजेच्या सुमारास रेल्वेची धडक बसून एका तरुणांचे (वय अंदाजे-३०ते ३२ वर्ष) निधन झाले आहे.त्याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदणी केली आहे.याबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत आहे.

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात रेल्वे मार्गावर खांब क्रमांक के.एम.नं.४४५/०२ जवळ रात्रीच्या दीड वाजेच्या सुमारास घडली असून त्यात साधारण वय वर्ष ३० ते ३२ वयाचा तरुण रेल्वेची धडक बसून ठार झालेला आहे.त्यास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

कोपरगाव तालुक्यातून इंग्रज राजवटीत दौन्ड-मनमाड हा रेल्वे मार्ग करण्यात आला आहे.गत चार पाच वर्षांपासून त्याचे विद्युतीकरण करण्यात आले आहे.त्याचे वर्तमानात दुहेरीकरण काम वेगाने सुरु आहे.सदर मार्गावरून साधारण प्रतिदिन ७०-८० रेल्वे गाड्यांची आवक-जावक सुरु असते.बऱ्याच वेळा अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण गेल्याचा घटना घडल्या आहेत.तर बऱ्याच वेळा काही नागरिक आत्महत्या करण्यासाठी रेल्वे मार्गावर येतात.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात रेल्वे मार्गावर खांब क्रमांक के.एम.नं.४४५/०२ जवळ रात्रीच्या दीड वाजेच्या सुमारास घडली असून त्यात साधारण वय वर्ष ३० ते ३२ वयाचा तरुण रेल्वेची धडक बसून ठार झालेला आहे.त्यास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या हे शोधण्याचे आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.सदर माहिती कान्हेगाव स्टेशन प्रबंधक यांना मिळाल्यावर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या बाबत आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू.क्रं.७७/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close