जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पश्चिम कोपरगावात पावसामुळे नुकसान,पंचनामे करण्याचे आदेश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव,शहाजापूर, वेळापूर, मढी बु. माहेगाव देशमुख परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले होते. त्या नागरिकांसाठी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने रात्रीच्या भोजणाची व्यवस्था करून कार्यकर्त्यांना सूचना देवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी स्वत: पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले आहेत.

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शहाजापूर,सुरेगाव,वेळापूर माहेगाव देशमुख व मढी बु.परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पावसाचे पाणी शेतात देखील मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे बाजरी,सोयाबीन,मका,कपाशी,आदी उभ्या पिकांचे नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्यामुळे कांदे भिजले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शहाजापूर,सुरेगाव,वेळापूर माहेगाव देशमुख व मढी बु.परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पावसाचे पाणी शेतात देखील मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे बाजरी,सोयाबीन,मका,कपाशी,आदी उभ्या पिकांचे नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्यामुळे कांदे भिजले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मढी. बु. येथे आदिवासी वसाहत,सुरेगाव येथे ४० येथील झोपडी परिसर,अंबिकानगर मधील किराणा दुकान,मेडिकल मध्ये,शहाजापूर येथील नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजले होते. या नुकसानीची आ. काळे यांनी पाहणी करून नागरिकांना धीर दिला. सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक नागरिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी गौतम सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन राजेंद्र ढोमसे, माजी उपसभापती वाल्मिक कोळपे, मढी खु. चे सरपंच बापूसाहेब गवळी, उपसरपंच आण्णासाहेब गवळी, शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे,सुरेगाव चे सरपंच शशिकांत वाबळे,उपसरपंच अनिल कोळपे,नुकसानग्रस्त गावचे पोलीस पाटील,तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close