जाहिरात-9423439946
निधन वार्ता

हिंदुत्ववादी कायकर्ता हरपला,कोपरगाववर शोककळा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   गोहत्या बंदी,लव्ह जिहाद,अवैध धर्मांतरण आदी साठी रात्रंदिन झटणारे प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते,कोपरगाव हिंदू जनजागृती समितीचे केंद्र प्रमुख म्हणून ओळख निर्माण केलेले जेष्ठ कार्यकर्ते दिलीप बाळकृष्ण सारंगधर (वय-६२)यांचे आज दुपारी ०२.३० वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

स्व.दिलीप बाळकृष्ण सारंगधर यांनी आपल्या हयातीत कोपरगाव येथे हिंदू जनजागृती समितीचे केंद्र प्रमुख म्हणून काम केले होते.त्यांनी सनातन संस्थेचे प्रसिद्ध होणारे साप्ताहिक,’सनातन प्रभात’ च्या प्रसारासाठी मोठा वेळ खर्ची घातला होता.त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांची मुलगी श्रद्धा सारंगधर व जावई यांनीही कोल्हापूर येथे पूर्ण वेळ हिंदू धर्मासाठी काम सुरु ठेवले आहे.

   स्व.दिलीप बाळकृष्ण सारंगधर यांनी आपल्या हयातीत कोपरगाव येथे हिंदू जनजागृती समितीचे केंद्र प्रमुख म्हणून काम केले होते.त्यांनी सनातन संस्थेचे प्रसिद्ध होणारे साप्ताहिक,’सनातन प्रभात’ च्या प्रसारासाठी मोठा वेळ खर्ची घातला होता.त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांची मुलगी श्रद्धा सारंगधर व जावई यांनीही कोल्हापूर येथे पूर्ण वेळ हिंदू धर्मासाठी काम सुरु ठेवले आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात त्यांनी हिंदुत्वाची मोठी जनजागृती केली होती.त्यांना आज दुपारी दोनच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने स्वतः त्यांनी डॉ.मुळे हॉस्पिटल मध्ये हजर झाले होते.उपचार सुरु करण्याच्या वेळी त्यांना पुन्हा एकदा हृदय विकाराचा दुसरा झटका आला असता त्यात त्यांची प्राण ज्योत मालवली असल्याची माहिती मिळाली आहे.उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रयत्नांची शिकस्त करूनही त्यांना वाचविण्यात यश लाभले नाही.

दरम्यान त्यांच्यावर कोपरगाव येथे गोदावरी काठी गुरुवार दि.२८ मार्च रोजी सकाळी ०९ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांचे निधन कोपरगावकरांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे.

   त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,विनायक गायकवाड,माजी सचिव योगेश वाणी,भाजप सोशल मीडिया सेलचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष समीर आंबोरे,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अड्.मच्छीन्द्र खिलारी,सुभाष दवंगे,कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.जयंत जोशी आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close