शैक्षणिक
…या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्थांचा गौरव !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये विश्वस्त पदावर कार्यरत असलेल्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांना, द बेस्ट मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“हा सन्मान माझा वैयक्तिक नसून समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रत्येक घटकाचा आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना भविष्यासाठी सक्षम बनवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली असून पुढील काळातही त्यासाठी कटिबद्ध राहू”-स्वाती संदीप कोयटे,विश्वस्त,समता इंटरनॅशनल स्कूल,कोकमठाण.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी काही वर्षांपूर्वी समता इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण हद्दीत सुरू केले होते.त्याला कोपरगावसह नजीकच्या तालुक्यातील पालकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत कार्यकारी विश्वस्त पदावर स्वाती कोयटे या कार्यरत आहे.संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक,सामाजिक उपक्रम राबवले जातात.या उपक्रमांची याआधीच अनेक संस्थांनी दखल घेतली आहे.आता
शैक्षणिक गुणवत्ता,प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ‘ द टाइम्स ऑफ इंडिया व द स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स–२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांना द बेस्ट मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र’ या पुरस्काराने गौरवले आहे.त्याबद्दल पालक,विद्यार्थी,शिक्षक,नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



