
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
श्रीरामपुर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आधीच अतिवृष्टी व त्यानंतर कोरोनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे कोरोनाच्या विषाणू मूळे आधीच कंबरडे मोडलेले असताना हि दुसरे अस्मानी संकट येऊन कोसळले आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.शेतीमालाचा भाव आधीच कोसळले असताना हा फटका शेतकऱ्यांना पेलवणारा नाही.या साठी शासनास पुढाकार घेऊन नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
बुधवारी सायंकाळी वादळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली.वादळ एवढे जोरात होते की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही पडल्या. वादळासह आलेल्या जोरदार पावसाने काढणीला आलेला गहू जमीनदोस्त,रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.त्यामुळे आधीच अतिवृष्टी व त्यानंतर कोरोनाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे पोलही पडले तर काही ठिकाणी विजवाहक ताराही तुटल्या.त्यामुळे ३३ केव्ही सूतगिरणी व बेलापुर , एम.आय.डी.सी., उपकेंद्रातील सर्व गावे अंधारात गेले आहेत.