जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

नगराध्यक्ष वहाडणे यांनी अखेर सोडला पदभार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे “आपला पदभार सोडणार” असल्याचे वृत्त आमच्या प्रतिनिधीने दिल्याने कोपरगावच्या राजकीय आसमंतात अपेक्षेप्रमाणे मोठी खळबळ उडाली. या बातमीची खातरजमा करण्यासाठी अनेकांनी दिल्ली पासून मुबंई व राज्याच्या विविध भागातून विचारणा केली व अनेकांचे औत्सुक्य चाळवले गेले व सगळ्यांचे लक्ष आज अध्यक्ष वहाडणे यांच्या संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाकडे लागले होते.मात्र प्रत्यक्षात त्यांनी आपला पदभार सोडला असला तरी तो “जागतिक महिला दिना ” निमित्त महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी.हा कार्यभार त्यांनी भाजपच्या (कोल्हे गटाच्या ) महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ताराबाई जपे यांच्याकडे दिला असून त्याचा कालावधी दोन दिवस असल्याचे त्यांनी आपल्या माहिलादिनाच्या कार्यक्रमात जाहीर केल्याने अखेर त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे.

सत्ताधारी गटाच्या हितशत्रूनी त्यांच्या एका जेष्ठ महिला सभापतीस “पद”मिळवूनही त्या पदाची निर्भत्सना “बाहुले” म्हणून करण्यास विसरले नाही.या गोंधळात दोन्ही गडावरील नेते आणि त्यांचा स्वीय सहाय्यक व त्यांचे नेते यांची भलतीच त्रेधातिरपट उडाली त्यांना ऐन वेळी काय प्रतिक्रिया नोंदवाव्या हेही कळेना.त्यांनी मग थेट अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून अशी नगरपंचायत अधिनियमात तरतूद आहे का ? जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली का ? अशा मकलाशा सुरु केल्या,तर काहींनी स्वतः आपले स्वीय सहाय्यक या घटनेची खातरजमा करण्यासाठी पालिका परिसरात मुद्दामहून पाठवले गेले.या सर्वात कुचंबणा झाली ती सत्ताधारी गटाची त्यांची अवस्था अवघड जागेचे दुखणे बनले.सहमती दर्शविणे म्हणजे वहाडणे यांचे कार्यकौतुक तर नाक मुरडावे तर आपलीच जेष्ठ महिला सभापती नाराज.त्यामुळे त्यांनी या जागेपासून दुर जाणे पसंत केले.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे “आपल्या पदाचा कार्यभार सोडणार” असल्याची बातमी आमच्या प्रतिनिधीस गुप्त पद्धतीने मिळाली होती.त्यानुसार आमच्या प्रतिनिधीने ती बातमी प्रकाशित केली.आणि अपेक्षेप्रमाणे अनेकांचे औत्सुक्य चाळवले गेले. अपेक्षेप्रमाणे अनेकांनी त्यावर सामाजिक संकेत स्थळावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली त्यात जसे समर्थक होते तसे हितशत्रूही होते जो तो आपल्या गजाने मोजमाप करून त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत होता.काहींनी, “त्यांना जनतेने पाच वर्षासाठी निवडून दिले आहे.त्यांनी आधीच आपल्या पदाचा त्याग करू नये.विधानसभा निवडणुकीत पराभव होत जात असतात.असे म्हणून त्यांचे सांत्वन करून त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला तर काहींनी,”बरे झाले त्यांना काम करता येत नव्हते” इथपर्यंत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या तर काहींनी तिसरा पर्याय म्हणून त्यांची शहर व तालुक्याला कशी गरज आहे याची विश्लेषण केले.

त्याच गटाच्या हितशत्रूनी त्यांच्या एका जेष्ठ महिला सभापतीस “पद”मिळवूनही त्या पदाची निर्भत्सना “बाहुले” म्हणून करण्यास विसरले नाही.या गोंधळात दोन्ही गडावरील नेते आणि त्यांचा स्वीय सहाय्यक व त्यांचे नेते यांची भलतीच त्रेधातिरपट उडाली त्यांना ऐन वेळी काय प्रतिक्रिया नोंदवाव्या हेही कळेना.त्यांनी मग थेट अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून अशी नगरपंचायत अधिनियमात तरतूद आहे का ? जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली का ? अशा मकलाशा सुरु केल्या,तर काहींनी स्वतः आपले स्वीय सहाय्यक या घटनेची खातरजमा करण्यासाठी पालिका परिसरात मुद्दामहून पाठवले गेले.या सर्वात कुचंबणा झाली ती सत्ताधारी गटाची त्यांची अवस्था अवघड जागेचे दुखणे बनले.सहमती दर्शविणे म्हणजे वहाडणे यांचे कार्यकौतुक तर नाक मुरडावे तर आपलीच जेष्ठ महिला सभापती नाराज.त्यामुळे त्यांनी या जागेपासून दुर जाणे पसंत केले.तर खडकी भागातील प्रभारी नगराध्यक्षा ताराबाई जपे यांच्या प्रभागातील त्यांच्या समर्थकांनी मात्र त्यांना मोठा फेटा,शाल श्रीफळ आणून त्यांचा गौरव केला व त्या समर्थनार्थ पालिका प्रवेशद्वारात फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

तसा अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी आधी तो सत्कार महिला नगरसेवकांच्या उपस्थितीत व पत्रकारांच्या उपस्थितीत केला होताच.या वेळी काही माध्यमातील विशेष (!) तज्ज्ञांनी किती दिवस चार्ज देणार व प्रत्येक महिला नगरसेवकाला देणार का ? तर काहींनी पुरुष नगरसेवकांना पुरुष दिनाच्या दिवशी संधी देणार का ? असे आपले बौद्धिके चाळवून आपल्या आकांच्या आदेशा प्रमाणे वहाडणे यांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला. तर दुसरीकडे या पदासाठीसाठी किती यातायात केली जाते याची उदाहरणे समोर आहे.पद आणि प्रतिष्ठेसाठी औरंगजेबासारखे सम्राट भाऊ दारा शेखो व पित्याची हत्या करण्यापर्यंत जातात तर राज्यातील नेते आपल्या घराणेशाहीसाठी काय काय करतात याचा याची देही याची डोळा प्रताप कोपरगावकरांनी या पूर्वीच्या निवडणुकांत पाहिले आहेत.या पूर्वीही अध्यक्ष वहाडणे यांनी ध्वजारोहणाचा सन्मान शहीद जवानाच्या पत्नीस,स्वच्छता कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आदींना दिला असून असा अध्यक्ष पुन्हा पालिकेस मिळेल कि नाही याची चर्चा नागरिकांत झडू लागली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close